Home Breaking News • विष्णू मंदिराच्या जागेवर वॉटर एटीएम बांधण्यास नागरिकांचा विरोध. • संत...

• विष्णू मंदिराच्या जागेवर वॉटर एटीएम बांधण्यास नागरिकांचा विरोध. • संत गाडगेबाबा प्रभागातील घटना • सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता

2
Oplus_131072

• विष्णू मंदिराच्या जागेवर वॉटर एटीएम बांधण्यास नागरिकांचा विरोध.

• संत गाडगेबाबा प्रभागातील घटना

• सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता

वरोरा : शहरात विकासात्मक कार्य झाली पाहिजे. पण ती करताना सामाजिक सलोखा बिघडू न देण्यासाठी कोणत्याही प्राचीन धार्मिक स्थानांचा विध्वंस न करता व्हावीत हे अभिप्रेत असताना मात्र वरोड्यातील संत गाडगेबाबा प्रभागात वॉटर एटीएम बांधण्यासाठी यास छेद देणारी घटना घडण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेच्या या संभाव्य जागेवर एटीएम बांधण्यास त्या वार्डातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे.
‌‌ शहरातील संत गाडगेबाबा प्रभाग क्रमांक सात मधील जीवतोडे यांच्या घराजवळील परिसरात भगवान विष्णूची मूर्ती आहे .भगवान विष्णूचे सदर मंदिर हे प्राचीन असून त्या पुरातन मूर्तीची नागरिकांकडून रोज पूजा अर्चना केली जाते. या मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी नागरिकांनी विष्णू मंदिर पुनरुत्थान समितीची स्थापना केली आहे.
या समितीतर्फे सदर मंदिराचे बांधकाम करताना नगरपरिषद व नागरिकांना कोणती अडचण येणार नाही असे आशयाचे अशा आशयाचे हमीपत्र नगर परिषदेला देण्यात आले आहे
मात्र नगर परिषदेतर्फे वार्डातील या जागेवर वॉटर एटीएम चे बांधकाम करण्याचे ठरत असून सदर जागेवर वॉटर एटीएम चे बांधकाम करण्यास नागरिकांचा विरोध आहे. प्राचीन काळापासून असलेल्या या भगवान विष्णूच्या मंदिराच्या जागेवर वॉटर एटीएमचे बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला तर धार्मिक भावना दुखावून सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वॉटर एटीएम वार्डातील सदर जागेवर न बांधता इतरत्र दुसऱ्या जागेवर बांधण्यात यावे. जेणेकरून वार्डातील शांतता अबाधित राहील व वार्डातील नागरीक एकोपाने राहतील अशी भावना विष्णू मंदिर पुनरुत्थान समिती ने व्यक्त केली आहे.