• साईनाथ कॉन्व्हेंट ने लहान विद्यार्थ्यांन सोबत साजरा केला
• स्वातंत्र्यदिन लहान विद्यार्थ्यांन मध्ये देश भक्ती ची परंपरा आणि संस्कार रुजविणे हे आमचे कर्तव्य – संचालक दीप्ती देशपांडे
वरोरा. १५ ऑगस्ट रोजी, देशभरातील शासकीय आणि निमशासकीय संस्था, कॉन्व्हेंट,शाळा, महाविद्यालये स्वातंत्र्य लढ्यातील शूर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी तिरंगा ध्वज फडकवून शहीद जवानांना नमन करतात. त्याच प्रमाणे बोर्डा येथील साईनाथ कॉन्व्हेंट च्या संचालक दीप्ती देशपांडे यांनी आपल्या शिक्षक स्टॉप सह लहान विद्यार्थ्यांना या 15 ऑगस्ट देशभक्तीच्या परंपरेशी आणि मूल्यांशी जोडण्यासाठी लहान विद्यार्थ्यांन कडून देश भक्ती वर नृत्य,भाषण आणि हातात तिरंगा घेवून भारत माता की जय,वंदे मातरम् च्या घोषणा देत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात रॅली काढून चिमुकल्या विद्यार्थ्यांन च्या मनात देशभक्ती बद्दल अंकुर फुलवीन्याचे कार्य साईनाथ कॉन्व्हेंट बोर्डा यांनी केले.रॅली दरम्यान अनेक लोकं घरा बाहेर येऊन मुलांचे कौतुक करत होते त्या आधी सकाळी 9 वाजता स्वातंत्र्यदिना निमित्त साऊंड माईक लावून राष्ट्रगीत म्हटले नंतर तीर्था गंधारे या चिमुकलीने १५ ऑगस्ट स्वतंत्र दिना निमित्त इंग्रजीत छोटेसे शुभेच्छा संदेश भाषण दिले .तसेच लहान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर एक मनमोहक सामूहिक नृत्य सादर केले. यानंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रॅली संपताच कार्यक्रमाच्या समारोपावेळी कॉन्व्हेंट च्या शिक्षिकेने सर्व लहान विद्यार्थ्यांना चॉकलेट ,बिस्किटे वाटून लहान मुलांचा आनंद द्विगुणित करत सर्व उपस्थिताना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.






