Home Breaking News • “तुम मुझे खून दो” चा नारा आजही प्रेरणादायी : आ. किशोर...

• “तुम मुझे खून दो” चा नारा आजही प्रेरणादायी : आ. किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार घुग्घुसमध्ये नेताजींना अभिवादन • भाजपा नेते व कार्यकर्त्यांकडून पुष्पहार अर्पण, ‘नेताजी अमर रहें’ च्या घोषणांनी घुमला परिसर

2
Oplus_131072

• “तुम मुझे खून दो” चा नारा आजही प्रेरणादायी : आ. किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार घुग्घुसमध्ये नेताजींना अभिवादन

• भाजपा नेते व कार्यकर्त्यांकडून पुष्पहार अर्पण, ‘नेताजी अमर रहें’ च्या घोषणांनी घुमला परिसर

घुग्घुस, १८ ऑगस्ट २०२६ आझाद हिंद सेनेचे सरसेनापती, स्वातंत्र्यलढ्यातील महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त घुग्घुस येथे आ. किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

“देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या” या थोर नेत्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे शांतता पाळण्यात आली. यावेळी उपस्थित भाजपा नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “जय हिंद” आणि “नेताजी अमर रहें” च्या घोषणांनी परिसर दुमदुमवून सोडला.

नेताजींचा त्यागच आमचा आदर्श – भाजप नेते याप्रसंगी भाजपा चंद्रपूर जिल्हा महामंत्री सौ. सविताताई दंडारे म्हणाल्या,

“नेताजींनी आपल्याला स्वातंत्र्यासोबतच स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली. आ. किशोर जोरगेवार साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही त्यांच्याच विचारांवर चालून राष्ट्रसेवेचे काम करत आहोत. आजच्या तरुणांनी नेताजींच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी.”

भाजपा घुग्घुस शहराध्यक्ष  संजय तिवारी म्हणाले, “नेताजींचे ‘दिल्ली चलो’ चे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. आ. किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात भाजपा नेहमीच राष्ट्रप्रथम या भावनेने कार्यरत आहे.”

महिला शहर अध्यक्षा सौ. सुचिता लुटे यांनी सांगितले की, “नेताजींचे मातृभूमीवरील प्रेम अतुलनीय होते. महिलांनीही देशहितासाठी पुढे यावे, हाच खरा त्यांना आदरांजली असेल.”

 

*भाजपा नेते व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग*

या अभिवादन कार्यक्रमाला भाजपा घुग्घुसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

उपस्थितांमध्ये  कौशरताई खान,  दुर्गाताई वैरागडे,  अनीता झाडे, हेमलता खोब्रागडे, शालिनीत राऊत,  कल्पना शिंदे,  पूजाताई दुर्गम,  सुनीता पाटील,  सुनीता घीवे, काजल वाढई,  शिवसजन गोहणे,  विशाल दामेर, गणेश  शेंडे,  स्वप्नील वाढई,   संजय पखाले,   संतोष लोडे,   रत्नदीप कोंडावार,  चिरंजीवी तालापेल्ली,  शंकर आवारी,  सतीश काम्पेल्ली आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन भाजपा कार्यकर्त्यांनी केले. शेवटी राष्ट्रभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

नेताजींच्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. त्यांचे विचार, धाडस आणि देशभक्ती हीच येणाऱ्या पिढ्यांसाठी खरी शिदोरी आहे, अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.