4 किलो 174 ग्राम गांजा जप्त वरोरा पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही दोन आरोपींना अटक
वरोरा
वरोरा पोलिस हद्दीत अमली पदार्थ विक्रीस आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून पोलिसांकडून अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या दिशादर्शकतेनुसार प्रभावी कार्यवाही करण्यात येत आहे.
गुप्त बातमीदाराकडून 18 सप्टेंबर 2026 ला पोलिसांना दोन इसम नागपूर येथून वरोरा येथे गांजा विक्री करिता घेऊन येणार आहे अशी माहिती मिळताच तात्काळ पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के ,सपोनी शरद भस्मे,पोउपनी मनीष तालेवार ,पो संदीप मुळे , पोहवा.प्रशांत नागोसे, पो अ.विशाल राजूरकर,पो अ मनोज ठाकरे,पो अ महेश गावतुरे,या पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी तात्काळ आनंदवन चौक येथे नाकाबंदी करून मोटार सायकलवर येणाऱ्या दोन संशयित इसमांची मोटार सायकल थांबवून त्यांच्या जवळ असलेल्या बॅगची पंचा समक्ष एन डी पी एस कायदा अन्वये झडती घेतली असता आरोपीकडून गांजा 4.174 ग्राम बाजार भावानुसार अंदाजे किंमत 2,08700 रु, एक जुनी मोटार सायकल किंमत 1,00000,एक खाकी रंगाची कॉलेज बॅग की.500 रु, ओपो कंपनीचा मोबाईल की.20,000 रु,एकूण 03,29,200 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.आरोपी रिजवान सलीम रंगरेज वय 23 वडार मोहल्ला वरोरा,सुभाष कालू पवार वय 39 वडार मोहल्ला वरोरा या दोन आरोपींविरुद्ध एम डी पी एस कायदा कलम 8(क),20(ब)( ii) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.







