सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे —- खा. प्रतिभा धानोरकर
वरोरेकर सर्वपक्षीय स्नेहमंचाद्वारे आयोजित कोजागिरी पौर्णिमा उत्सवात प्रतिपादन.
वरोरा दि, ३० ऑक्टोबर
लोकांच्या मूलभूत गरज आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरिता विकास कामे करणे गरजेचे आहे. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात सिंचन, पिण्याचे पाणी, रस्ते, दिंडोरा बॅरेज प्रकल्प आदी समस्या पूर्णत्वास न्यायच्या असतील तर श्रेयवादाच्या लढाईत न पडता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खा. प्रतिभा धानोरकर यांनी केले. वरोरेकरांच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय कोजागिरी स्नेहसंमेलनामध्ये त्या बोलत होत्या.
शेतकरी भावनांमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात आ. करण देवतळे यांचेसह प्रसिद्ध उद्योजक प्रकाश मुथा, लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील, उद्योजक डॉ. रमेश राजुरकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे,भद्रावती नगर परिषदेचे अध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, ऐतेशाम अली, अनिल धानोरकर, वरोरा नगरपरिषदेच्या अध्यक्ष अर्चना ठाकरे, उपाध्यक्ष योगिता नेरकर, वेदांती देवतळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शंभुनाथ वरघणे, प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. रमेश जाजू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयंत टेमुर्डे, तालुका संघचालक सुनील सरोदे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्यामध्ये संवाद व सहकार्य वाढावे आणि यातून विकासाची गंगोत्री विधानसभा क्षेत्रात निर्माण व्हावी या हेतूने आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. करण देवतळे यांनी वरोरा शहरातील पाणीपुरवठा योजना परस्पर सहकार्यातून तातडीने पूर्णत्व नेण्याचे आश्वासन दिले. राजकीय पक्षामध्ये संवाद आणि सहकार्याची भावना वाढल्यास अनेक विकास कामे दोन्ही तालुक्यात मार्गी लागतील असे ते म्हणाले आणि आयोजकांच्या अभिनव संकल्पनेबद्दल त्यांचे कौतुक केले. प्राध्यापक श्रीकांत पाटील यांनी वरोरा भद्रावती क्षेत्रातील राजकीय पटलावरील विविध राजकीय नेत्यांचा आढावा घेत राजकीय पक्षाची विचारधारा ही निवडणुकीपूर्तीच असावी त्यानंतर विकासाचे ध्येय पुढे ठेवणे हीच आपली परंपरा असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व भुलाबाईंच्या पूजनाने झाली. शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत खुळे यांनी केले.
कोजागिरी उत्सव यशस्वी करण्यासाठी वरोराकर सर्वपक्षीय स्नेहमंचाचे विठ्ठल टाले ,रमेश मेश्राम ,गणेश चवले ,सुभाष दांदडे ,विनोद कुमार बाफना ,विलास नेरकर ,विजय मोकाशी , एच. पी.सिंग , गोपाळ धोटे , यादव घ्यार, राम जुनघरे ,अतुल वानखेडे , प्रफुल आसुटकर, पंकज राजुरकर, प्रमोद बोरा, प्रमोद वाभीटकर ,वैभव डहाणे, शरद यादव आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी करिता परिश्रम घेतले.
चंद्राच्या शीतल प्रकाशात, आपुलकीच्या नात्यांचा गोडवा अनुभवण्यासाठी आयोजित स्नेहमेलनात शहरातील गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.







