Home Breaking News सहज सुचलंचा एक अभिनव उपक्रम! ——————————— रंजु मोडके यांचे अभिनंदन!

सहज सुचलंचा एक अभिनव उपक्रम! ——————————— रंजु मोडके यांचे अभिनंदन!

2

सहज सुचलंचा एक अभिनव उपक्रम!
———————————
रंजु मोडके यांचे अभिनंदन!

🌟💐🌟महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या वतीने कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार आयोजित केल्याची बातमी काल कानावर पडली.मनस्वी
आनंद वाटला! उशिरा का होईना परंतु रंजू दिलीप मोडके या तरुणीने संयोजिका म्हणून एक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेवून एक पाऊल पुढे टाकले.अर्थातच या उपक्रमासाठी तिला मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांचे सहकार्य मिळणार यात मुळीच शंका नाही.आज पर्यंत आपण आपल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक पुरस्कार स्वीकारले पण आता आपण आपल्या कर्तृत्वान व गुणी कलावंतांना सन्मानित केले पाहिजे ही भावना तिने मनाशी जपली.
रंजु मोडके ही एक कर्तृत्ववान सहज सुचलंची संयोजिका अशी तिची ओळख आहे!
अल्प कालावधीत तिने मायाताई कोसरे,मेघा धोटे व विजया भांगे यांचा विश्वास संपादन केला.विश्वास असा संपादन केला की आज या तिन्ही जेष्ठ मार्गदर्शिकांना तिचा शब्द पाळावा लागतो.सहज सुचलंच्या जडणघडणीत तिचा सिंहाचा वाटा आहे.सहसंयोजिका नलिनी आडपवार यांच्या सहकार्यातून तिने सहज सुचलंला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सलग चार वर्षे ती संयोजिका म्हणून सहज सुचलंची जबाबदारी पार पडत आहे. ‌
आजच्या घडीला सहज सुचलंचे नाव अख्ख्या महाराष्ट्रात पोहचले आहे.
ही साधी व सोपी बाब नाही.
रंजु मोडके हिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
तिने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा व शुभकामना! व तिचा सहज सुचलंचा प्रवास असाच पुढे सुरू राहावा हि मनोकामना!
——अमय————–