Home Breaking News BPL सीझन १० मधील उत्कृष्ट खेळाडूचा सायकल व ट्रॉफी देऊन गौरव! ...

BPL सीझन १० मधील उत्कृष्ट खेळाडूचा सायकल व ट्रॉफी देऊन गौरव! सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम; स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन

8

BPL सीझन १० मधील उत्कृष्ट खेळाडूचा सायकल व ट्रॉफी देऊन गौरव!

सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम; स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन

बल्लारपूर : शहरातील क्रीडाप्रेमींचे आकर्षण ठरलेल्या बल्लारपूर प्रीमियर लीग (BPL) सीझन १० च्या बक्षीस वितरण सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा विशेष गौरव करण्यात आला. सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब, बल्लारपूरच्या वतीने स्पर्धेतील ‘बेस्ट प्लेअर’ला आकर्षक सायकल आणि ट्रॉफी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

फॅन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर आणि विनोद कोवे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खेळाडूंच्या मेहनतीचे आणि कौशल्याचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमामुळे स्थानिक खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, क्रीडा क्षेत्रातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या फॅन्स क्लबच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.