Home Breaking News बल्लारपुरात भारतीय संविधान सन्मान रॅली उत्साहात; महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग ...

बल्लारपुरात भारतीय संविधान सन्मान रॅली उत्साहात; महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग महापुरुषांच्या वेशभूषेतील बालकांनी वेधले लक्ष; संविधानाच्या जयघोषाने शहर दुमदुमले

9

बल्लारपुरात भारतीय संविधान सन्मान रॅली उत्साहात; महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

महापुरुषांच्या वेशभूषेतील बालकांनी वेधले लक्ष; संविधानाच्या जयघोषाने शहर दुमदुमले

बल्लारपूर : भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि संविधानिक अधिकारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर शहरात भव्य भारतीय संविधान सन्मान पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत महिला, पुरुष, युवक, युवती आणि बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. संविधानाच्या जयघोषाने संपूर्ण शहर परिसर दुमदुमून गेला.

रॅलीची सुरुवात वैशाली चौकातील महाबोधी महाविहार येथून झाली. प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत गायन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहराध्यक्ष उमेश कडू यांच्या नेतृत्वात निघालेली ही रॅली विजयस्तंभ, झाशी राणी चौक, सुभाष टॉकीज चौक मार्गे रेल्वे चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत पोहोचली. येथे पुन्हा संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

रॅलीतील लहान मुलांनी महापुरुषांच्या वेशभूषेत सादर केलेले देखावे आणि भारतीय संविधानाची प्रतिकृती विशेष आकर्षण ठरली. हातात संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश आणि घोषणांच्या माध्यमातून सहभागी नागरिकांनी संविधानाप्रती आपला आदर व्यक्त केला.

यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले भंते आनंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू यांनी आपल्या संबोधनातून महिलांच्या मोठ्या सहभागाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतातील प्रत्येक नागरिकाची आहे. मात्र, या रॅलीत महिलांनी घेतलेला पुढाकार संविधानिक मूल्यांप्रती असलेली त्यांची जागरूकता दर्शवितो. वंचित बहुजन आघाडी ही प्रखर संविधानवादी संघटना आहे.”

या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी महिला आघाडीच्या ज्येष्ठ सल्लागार सत्यभामा भाले, तालुकाध्यक्षा नम्रता साव, शहराध्यक्षा रेखा पागडे, शहर महासचिव गौतम रामटेके, शहर संघटक राकेश पेटकर, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अभिलाष चुनारकर यांच्यासह सुप्रिया चंदनखेडे, स्वीटी लोंढे, संगीता साखरे, प्रज्ञाताई नमनकर, जोशीला वाघाडे, अनिता शंभरकर, शंकर वनकर, राहुल डांगे, सुरज शृंगारे, मोनू खोब्रागडे आणि प्रियंकेश शिंगाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच अजय चव्हाण, धनंजय रिंगणे, तुलाराम ढवडे आणि बंडू मोटघरे यांनी सहकार्य केले. संपूर्ण रॅलीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा आणि भारतीय संविधानाचा जयघोष करण्यात आला. अखेरीस राष्ट्रगीताने या संविधान सन्मान रॅलीची उत्साहपूर्ण सांगता झाली.