नगर पालिकेचा लेखी आदेश अचानकपणे मागे?
शेगाव : संतनगरी शेगाव शहरात सोमवार १३ जुलैपासून सर्वपक्षीय तीन दिवसीय ‘जनता कर्फ्यू’ चे आवाहन आज शनिवारी ( ता. ११) दुपारीच करण्यात आले होते ; मात्र त्यानंतर अचानक जनता कर्फ्यू तात्पुरता स्थगित करण्यात आला, अशा स्वरूपाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. शेगाव जनता कर्फ्यू मागे का घेतला गेला? आता या मागे काही श्रेयाचे राजकारण आहे का? हे राजकारण कोण करत आहे? मुख्याधिकार्यांनी लेखी आदेशाने काढलेली जाहीर सुचना कुणाच्या सांगण्यावरून रद्द केली? याबाबत ‘रियालिटी’ चेक The रिपब्लिकच्या माध्यमातून आम्ही करणार आहोतच. मात्र कोरोणाच्या काळातही राजकारणी, विरोधक असो वा सत्ताधारी , जर जनतेच्या जीवाशी खेळत असतील तर त्यांना जनता नक्कीच माफ करणार नाही हे या निमित्ताने सांगावेसे वाटते! सोबतच ज्या सर्वपक्षीयांनी जनता कर्फ्यू आवाहन करून माध्यमांना बातम्या पुरवल्या होत्या, त्याच सर्वपक्षीय नेत्यांना ‘the रिपब्लिक’ चा सवाल आहे की, जनता कर्फ्यू स्थगित करण्याची गरज का भासली ? हाच प्रश्न घेऊन आम्ही सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटणार आहोतच…
कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत असताना काही राजकीय नेते या संकट काळातही आपली राजकीय पोळी शेकून घेण्याचा आटापिटा करत आहेत. जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. सर्वत्र श्रेयाची लढाई पाहायला मिळत आहे. मुंबई येथील जगातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेला धारावीचा परिसर कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे.जगभरात महाराष्ट्राचे त्यामुळे कौतुक होत आहे. आपले राजकीय नेते मात्र त्याचं श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करत आहेत. जे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, सफाई कामगार, प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी अगदी चतुर्थ कर्मचारी वर्गापासून तर शिक्षकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जे परिश्रम घेत आहेत त्यांना कोरणा मुक्तीचे श्रेय देण्याची दानत राजकीय नेत्यांनी दाखवण्याची गरज आहे. परंतु असे न करता श्रेय घेण्यासाठी राजकीय आरोप-प्रत्यारोप दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरु आहेत. शेगावातील जनता कर्फ्यू रद्द करण्यामागे कोण असेच राजकारण करत आहे काय? हे आम्ही सुद्धा जनतेला नक्कीच सांगू !!या विषयावर ज्या राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना निडर आणि बेदरकारपणे व्यक्त व्हायचे असेल तर त्यांनी आमच्या 94 23 23 7001 या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा shridharnews24@gmail.com या मेलवर स्वतःच्या पासपोर्ट फोटोसह आपली प्रतिक्रिया पाठवावी….
श्रीधर ढगे
संपादक
The रिपब्लिक!