Home Breaking News प्रस्तावित बदल्यांमध्ये पातुर्ड्याला शिक्षक मिळणार का?

प्रस्तावित बदल्यांमध्ये पातुर्ड्याला शिक्षक मिळणार का?

257

पातुर्डा येथील पालकांचा उद्विग्न सवाल

द रिपब्लिक न्युज नेटवर्क
पातुर्डा : येथील जिल्हा परिषद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात विविध पदे रिक्त आहेत. मात्र ऑर्डर होवून कर्मचारी रुजू न होता राजकीय वराधास्तमुळे परस्पर सोईच्या ठिकाणी रुजू होतात त्यामुळे येथील विविध पदे रिक्त राहतात. सध्या स्थितीत मुख्याध्यापकांचे पद रिक्त असून अकरावी व बाराविसाठी एक प्राध्यापकाची जागा रिक्त आहे. इयत्ता नववी व दहावीचे चार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सहा ते आठ एक शिक्षकाचे पद रिक्त आहे.शिपाई दोन पदे रिक्त आहेत.त्यामुळे हा ताण इतर कर्मचऱ्यांवर येतो.सध्या शासनाने काही प्रमाणात बदल्या करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.त्यामुळे येथून काही कर्मचारी बदली पात्र ठरणार आहेत. अशा परिस्थितीत नवीन कर्मचारी येत नाही व बदल्यामुळे आणखी जागा रिक्त होण्याची भीती आहे .त्यामुळे शिक्षक देण्याची हिंमत नसेल तर बदल्या करता कशाला ? असा उद्विग्न सवाल येथील पालक करीत आहेत. विद्याथ्यांचे शैक्षनिक नुकसान होऊ नये यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे.
मागील काळात एस. एम सौदागर, पी पी खीरोडकर, संतोष काळे यांच्यानंतर विद्याथ्यांचे हित पाहणारा मुख्याध्यापक या शाळेला लाभला नाही.त्यामुळे शिस्तप्रिय मुख्याध्यापकाची या शाळेला गरज आहे. इतरत्र ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेला विद्यार्थी मिळत नसतांना पातुर्ड्यात सन्मानजनक विद्यार्थी संख्या आहे. गोर गरीबांचे मुले या शाळेत शिक्षण घेतात त्यामुळे त्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी शिक्षकांची गरज आहे आणि या बदल्यांमध्ये निश्चित पातुर्डा येथील रिक्त पदांकडे जिल्हा परिषद बुलडाणा लक्ष देईल असा आशावाद येथील नागरिकांना आहे. लोकप्रतनिधींनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यात नंबर वन
एकमेव तालुक्यात असलेले कला शाखेचे जिल्हा परिषदेचे कनिष्ठ महाविद्यालय व इयत्ता ५ ते १० वी चे विद्यार्थी यांचा विचार करता जि प चा शाळांना घरघर लागली आहे त्यात पातुर्ड्याची जिल्हा परिषद शाळा मात्र नंबर एक ठरणारी आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सन्मान वाढविणाऱ्या या शाळेकडे शासन व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पदे भरण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.