Home Breaking News शिष्यवृत्ती त्वरित वितरित करा, अन्यथा आंदोलन

शिष्यवृत्ती त्वरित वितरित करा, अन्यथा आंदोलन

288

विद्यार्थ्यांची निवेदनाद्वारे मागणी
द रिपब्लिक न्युज नेटवर्क
पातुर्डा : शिष्यवृत्ती त्वरित वितरित करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा १७ जुलै रोजी तालुक्यातील विद्यार्थ्यानी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमूद आहे कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार मॅट्रिकत्तोर शिष्यवृत्ती तसेच सर्व प्रकारच्या योजनांचे अनुदान तात्काळ विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या योजना मंजूर आहेत पण ते प्रशासन स्तरावर प्रलंबित आहेत. परंतु या योजना अजून पर्यंत विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले नाही. तरी शासनाने ४ मे 2020 रोजी चा काढलेला अध्यादेश रद्द करावा आणि तात्काळ विद्यार्थ्यांना निधी वितरित करावा. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. अशी मागणी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी दिले आहे.
या वेळी निवेदनावर १०० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेलं निवेदन तहसील कार्यालय यांच्या मार्फत मुख्यमंत्री कार्यालय, राज्यपाल, उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री कार्यालय, राज्यमंत्री, सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि समाजकल्याण कार्यालय बुलढाणा, अकोला आणि औरंगाबाद यांना प्रतिलिपीत देण्यात आले आहे. निवेदनावर अश्वजित भारसाकळे, अक्षय धुंदळे, रोशन भोजने, योगेश वाघोदे, विवेक वानखडे, संजय तायडे यांच्या सह्या आहेत.