Home मुंबई वाचा , अशी आहे किशोर भोसले यांच्या काँग्रेस प्रवेशाची खामगाव ते मुंबई...

वाचा , अशी आहे किशोर भोसले यांच्या काँग्रेस प्रवेशाची खामगाव ते मुंबई पर्यंतची ‘कहाणी’ !

1019

निखिल देशमुख / The रिपब्लिक ब्युरो

खामगांव : – खामगांव नगर पालीकेतील भाजपचे नगरसेवक किशोरआप्पा बाबासाहेब भोसले यांनी मंगळवार दि.21 जुलै 2020 रोजी मुंबई येथे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेउन भारतीय राष्टीय काॅंग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला. मुंबई येथे महाराष्ट प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,बुलडाणा जिल्हयाच्या संपर्कमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री ना.यशोमतीताई ठाकुर, विधानसभा अध्यक्ष नानाभाउ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये किशोरआप्पा भोसले यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश घेतला. याप्रसंगी प्रदेषाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी किषोरआप्पा भोसले यांचा तिरंगा दुपटट्ा व पुश्पगुच्छ देऊन काॅंग्रेस पक्षात स्वागत केले.यावेळी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, प्रमोद महाजन हे उपस्थित होते.

चर्चा, बातम्या आणि प्रवेश

21 जुलै रोजी सकाळपासूनच किशोरआप्पा भोसले हे काॅंग्रेसच्या गोटात सामील होणार अश्या प्रकारची चर्चा खामगांव शहरात व विविध सोशल मिडीयावर रंगली होती. अखेर सायंकाळी 7 वाजता त्यांनी मुंबई येथे काॅंग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस  पक्षात जाहिर प्रवेश घेतला आहे.

मराठा क्रांती मोर्चात अग्रणी

नगरसेवक किशोरआप्पा भोसले हे खामगांव प्रेस क्लबचे अध्यक्ष असुन ते मराठा महासंघ व जयभवानी सेवा ग्रुप चांदमारी सह इतर काही सामाजिक संस्थांशी जुडलेले आहे. किशोरआप्पा भोसले हे मनमिळावू स्वभावाचे असुन त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मराठा क्रांती मोर्चात बुलडाणा जिल्ह्यात त्यांची भूमिका अग्रणी होती. त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे त्याचा काॅंग्रेसला भविष्यात निश्चीतच फायदा होणार आहे.

समर्थकही भाजपा सोडणार?

किशोरआप्पा भोसले यांचा काॅंग्रेस पक्ष प्रवेशाने भाजपला मोठे खिंडार पडले असुन त्यांचे इतर समर्थकही काॅंग्रेसमध्ये सामील होणार आहे तसेच  खामगांव न.प.च्या कारभारामुळे त्रस्त होउन आणखीन काही नगरसेवक काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय गोटात वर्तविली जात आहे. भाजपचे सुद्धा पक्षातील आउटगोइंग थांबवण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून आमदार फुंडकर यांनी किशोर भोसले यांच्या काँग्रेस प्रवेशाची भनक लागताच सर्व नगरसेवकांची तडकाफडकी मंगळवारी सायंकाळी नगरपालिकेत बैठक घेतली दरम्यान किशोर भोसले वगळता अन्य कोणत्याही नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात नसल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे.

बुलडाणा जिल्हयाचे काॅंग्रेस नेते मुकूलजी वासनिक,जिल्हाध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे व माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात खामगांव मतदार संघात काॅंग्रेस पक्ष बळकटीसाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करु.
– किशोरआप्पा भोसले, युवा मराठा नेता