Home विदर्भ ठरलं, असा राहील जनता कर्फ्यू

ठरलं, असा राहील जनता कर्फ्यू

6614

नियम पाळले नाही तर कारवाई होणार

बुलढाणा – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी केले आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला आज जिल्हा नियोजन भवनामधील पालकमंत्री यांच्या दालनात आयोजित बैठकी दरम्यान पालकमंत्री महोदयांनी  आज १७ सप्टेंबर रोजी दुपारी दिल्या आहेत. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी षन्मुखराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ, अति जिल्हाधिकारी दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडित, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या5 हजाराच्यावर गेली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात जनता कर्फ्यु घोषित करण्यात यावा अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, संघटना यांनी केली होती. त्यानुसार जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दूध डेअरी, मेडिकल, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, बँक व शासकीय कार्यालय वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, आस्थापना बंद ठेवण्यात याव्या असे आवाहन करण्यात आले आहे.
जे लोक नियमांचे उल्लंघन करतील त्यांवर पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी व जनतेने जनता कर्फ्यु कडकडीत पाळणे गरजेचे आहे.
शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेले आपले कुटुंब आपली जबाबदारी या मोहिमे अंतर्गत शासनाच्या वतीने आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने सर्वेक्षणाच्या वेळी घरी हजर राहणे आवश्यक आहे. त्यावेळी देखील हा जनता कर्फ्यु महत्वाचा ठरणार आहे.

असा आहे शासकीय आदेश

18/09/2020 ते 30/09/2020 या कालावधीमध्ये  कायदे व आदेशांची प्रभावीपणेबअंमलबजावणी होण्यासाठी एस. राममुर्ती, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बुलडाणा,  यांंनी खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
1) आदेशाच्या कालावधीमध्ये नागरीकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पड़ नये. सर्वक्षणाचे वेळी घरी
नसल्यामुळे धोका ओळखता येत नसल्याने हि बाब सर्वेक्षणासाठी असहकार्य असल्याचे समजण्यात येऊन,
नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.
2) कोणत्याही  कारणासाठी सार्वजानिक ठिकाणी वावरतांना तिन पदरी मास्क किंवा साधा कापड़ी मास्क किंवा रुमाल/कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक असेल.
3) कोवीड -19 रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यकते प्रमाणे अत्यावश्यक सेवा बगळता, दुकाने आस्थापना/प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यासाठी व्यापारी संघटना/नागरीक संघा/खाजगी संस्था यांना आवाहन करण्यात
येते की, दिनांक 30/09/2020 पर्यंत आपआपली दुकाने/आस्थापना इत्यादी बंद ठेवुन मोहीमेस सहकार्य
करावे.
4)  नागरीकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे.
दुकानचालक /मालक यांनी दुकाने उघडी ठेवल्यास सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन एकावेळी 5 पेक्षा जास्त
ग्राहकांना प्रवेश देण्यात येऊ नये. कामाचे व्यवसायाचे ठिकाणी थर्मल स्क्रिनींग करणे, हात धुणे,
सॅनिटायझरचा वापर करणे इत्यादीं बंधनकारक राहील. तसेच नियमांचे पालन न केल्यास स्थानीक
स्वराज्य संस्थानी दंडनिय कार्यवाही करावी.
5) सार्वजनिक थुंकण्यास बंदी घालण्यात आली असुन, सार्वजानिक ठिकाणी चेह-यावर मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे
पालन करणे इत्यादी बाबीचे पालन न केल्यास, शहरी भागात संबंधीत मुख्याधिकारी नगर परिषद व
ग्रामीण भागात मुख्यकार्यकारी जि.प. बुलडाणा यांनी जागोजागी चेक नाके उभारुन मोहीम स्वरुपात 30 सप्टैंबर 2020 पर्यंत जिल्हयातील नागरीकांनी उपरोक्त् बाबींचे पालन न केैल्यास दंडात्मक वफौजदारी कारवाई करावी. यासाठी (अ) सार्वजानिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे इत्यादींसाठी 500/-
रु. दंड आकारावा. (ब) सोशल डिस्टंसिंकचे पालन न केल्यास ग्राहकासाठी रु. 500/- आणि दुकान मालक
यांना रु. 1500/- एवढा दंड करण्यात यावा.
6) सदर आदेशाची प्रभावी अंमलबाजवणी होण्यासाठी नगरपालिका व ग्रामपंचायत यांनी आपआपले
कार्यक्षेत्रामध्ये पथकांची नियुक्ती करुन, दंडनिय कार्यवाही करावी. पोलीस प्रशासनाने पथकांसोबत आवश्यक
तो पोलीस बंदोबस्त दयावा, नियम पाळणार नाहीत त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत