Home Breaking News गृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा

गृहमंत्री अनिल देशमुख यांना वंचितचा असाही इशारा

302

द्रोह करणाऱ्या त्या पोलिसांना अटक करा, पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, अन्यथा धरणे आंदोलन करू – प्रकाश आंबेडकर

पुणे, दि. २० – सरकारविरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का तसेच एन आय ए अंतर्गत अटक झाली पाहीजे ही आमची मागणी असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्रोह करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

एका वेबसाईडला मुलाखत देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की राज्यातील काही आयपीएस अधिकारी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सत्ताधारी पक्षाला पाडण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांमार्फत केला जात होता.अशाप्रकारे सरकार विरोधात द्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोक्का एन आय ए अंतर्गत अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांचे नावे जाहीर करण्यात यावी, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नावे जाहीर केली नाही तर त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल येईल असा इशारा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. या द्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात चेंडू असून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. असेही शेवटी ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.