विठ्ठल निंबोळकर
संग्रामपूर – संग्रामपूर शहरासह परिसरातील वरवट बकाल, पळशी झाशी, तामगाव, टूनकी, लाडणापुर यासह परिसरात रविवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांची मोठी नासाडी झाली असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे.
रविवार २० सप्टेंबर रोजी दिवसभर उकाडा असल्यामुळे नागरिक गरमीमुळे त्रस्त झाले होते . त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत होती . तर अशातच रात्री ११.३० च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस पडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे संग्रामपूर शहरातील शहरातील रस्ते, नाल्या तसेच छोटे नाले भरून वाहत होते. या पावसामुळे दिवसभर वातावरणात असलेला उकाडा दूर होवून पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत विजांचा कडकडाटासह परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. रात्री झालेल्या मुसळधार पाऊस पडल्याने संग्रामपूर तालुक्यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
माझ्या टुनकी येथील शेतातील मका पिकाचे रविवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मक्का पीक जमीनदोस्त झालेले आहे या नुकसानीचे पंचनामे करून मला तात्काळ मदत देण्यात यावी.
-सुरेश भिकाजी लोणकर
शेतकरी, टुनकी ( संग्रामपूर)