Home राजकारण जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात सक्षम नेतृत्वाचे पर्व….!

जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात सक्षम नेतृत्वाचे पर्व….!

788

साहेबांच्या स्वप्नपुर्तीकडे वाटचाल : नाना आणि ताईचा पुढाकार

“पक्षाने काय दिले यापेक्षा पक्षाला आम्ही काय दिले….” अशा राजकीय उंचीची मानसिकता असलेले सेनापती व लढवय्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर पक्षनिष्ठेचं ओझ असणारी कॉंग्रेस आजही भक्कम स्थितीत आहे…!
राष्ट्रव्यापी राजकीय वलय असलेले बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमेटीचे आराध्य दैवत मुकुल वासनिकांच्या प्रभावशाली नेतृत्त्वात निष्ठावंताची काॅग्रेस नेतृत्त्वा सोबत व पक्षीय विचारधारेशी प्रामाणिक आहे.
मुकुल वासनिक यांचा बुलढाणा जिल्ह्यात विशेष स्नेह अन् त्यात त्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघ अपेक्षित राजकीय उदिष्ट गाठु न शकल्याचे शल्य येथील निष्ठावंता मध्ये बैचेनी निर्माण करणारी ठरत आहे….!
परंतु आता जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात सक्षम नेतृत्वाचे पर्व सुरू झाल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करतांना दिसुन येतात….!
ते खामगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटिल व जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांच्या रुपाने….!
जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघ आणी मुकुल वासनिक यांच्यात असलेली आपुलकी आणी जिव्हाळा काँग्रेस मध्ये सर्वश्रृत आहे या मतदारसंघात साहेबांच्या नेतृत्वावर विश्र्वास असणारा सामान्य कार्यकर्ता देखील पक्षबांधणीसाठी सदैव खंबीर असल्याचे वारंवार दिसुन आले आणी साहेबांनी देखील निष्ठावंतांना नेहमीच न्याय दिला आहे….!
असे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व असतांना हा सक्षम नेतृत्वाचा वारसा चालविणारे स्थानिक पातळीवरील खंबीर नेतृत्वापासुन हा मतदारसंघ वंचित असल्याची भावना व्यक्त होत होती….!
मात्र, आता नाना- ताईंच्या रुपाने निर्विवाद पणे सक्षम नेतृत्वाचे पर्व सुरू झाल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
पक्षातील अंतर्गत गृहकलह व शितयुध्दात सलग मुळ ध्येयाला “शह” मिळाला.मात्र तरीही या मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रतिकूल परिस्थितीतही काॅग्रेस सोबत खंबीर होते. काँग्रेस ला संपविण्याचा घाट घालणार्यांच्या राजकीय “हयाती” संपल्यात मात्र, काॅग्रेस आजही मजबुत स्थितीत असुन येत्या काळात साहेबांच्या स्वप्नपुर्तीकडे वाटचाल सुरू असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे…..!
काँग्रेस च्या अमेद्य गडाला फितुरांनी सुरुंग लावून बुरुज पाडले असले तरीही लढवय्या कार्यकर्त्यांच्या ताकदीने गड मजबुत स्थितीत असल्याचे दिसून येते.
खामगाव विधानसभा मतदारसंघात व जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले “पक्षनेते” सक्षम नेतृत्व कसे काय? करु शकतात असा प्रश्न निश्चितचं “अतिरिक्त” राजकीय पुढार्यांना पडला असेलचं परंतु या दोन्ही मतदारसंघांत झालेला पराभव अन् त्याचे झालेलं राजकीय चिंतन सक्षम नेतृत्वाची पावती देणारे ठरली.
पुर्वीचा जलंब विधानसभा मतदारसंघ २०१९ च्या पुर्नरचनेत जळगांव जामोद बनला तेव्हा पासुन डॉ.संजय कुटे यांनी तख्त सोडला नाही याचं मतदार संघात शेगांव जोडल्या गेले अन् काॅग्रेसशी निष्ठावंत असलेल्या परिवारातील रामविजय बुरुंगले यांना पक्षनेतृत्वाने २००९-१४ मध्ये सलग संधी दिली परंतु त्यांचे बाबतीत सुद्धा अंतर्गत “गृहकलह” होताचं त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विजयी रथाची अप्रत्यक्षरित्या “खि” काढल्या गेली त्या पराभवाचे शल्य मनात न ठेवता पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी रामविजय बुरुंगले यांनी दम लावला.
आता या मतदारसंघात पुन्हा दमदार नेतृत्वाचे पर्व सुरू झाले आहे.
निवडणूकीची कुठलीही पुर्वतयारी नसतांना ऐनवेळेवर पक्षादेश मान्य करत ज्ञानेश्वरदादा उपाख्य नानासाहेब पाटिल यांनी अक्षरक्ष: प्रतिस्पर्धी उमेदवाराला घाम फोडला कदाचित राणा-नाना या जोडीव्यतीरिक्त इतर उमेदवार असता तर भाजपला इतका जोर लावायची गरज पडली नसती अशी प्रतिक्रिया पराभवानंतर स्थानिक “अराजकीय”लोकांची आहे. दिलीप सानंदांनी राजकीय विरासत म्हणुन नियोजन,संघटन, अन् मुस्सदी राजकारणाचे विकासात्मक “किस्से” काॅग्रेसला दिले. सानंदा सोबत असतांना नानांनी “दादा” या आदरयुक्त शब्दाची व्याख्या विद्यमान लोकप्रतिनिधींना स्पष्ट करुन दिली ती खामगावात….!
नानांचे नेतृत्व अल्पावधीत खामगाव च्या राजकारणात छाप सोडुन गेले. अन् पराभवाची सुध्दा चर्चा अन् चिंतन करण्यास विजयी उमेदवाराला देखील भाग पाडले…!
हिच नानांच्या सक्षम नेतृत्वाची दमदार सुरुवात असल्याचे स्पष्ट झाले. “सोपं नव्हतं हो….!” हे वाक्य आजही खामगावात नानांच्या नेतृत्वाचा पुरस्कार करणारे ठरते….!
तर जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघाला जातीयवादी मतदारसंघ म्हणुन बदनामीचा ठपका असतांना मुकुल वासनिक यांनी या मानसिकतेला भेद देणार्या सक्षम उमेदवार डॉ.स्वातीताई वाकेकर यांचेवर विश्र्वास टाकला.ज्या ताकदीने त्या लढल्या ती ताकद कदाचित “फितुर”झाली असावी…..! असे म्हणणे गैर ठरणार नाही ज्यांनी उघड बंड पुकारले ते बदनाम झालेत परंतु पडद्याआडच्या “सस्पेंन्स” ने खरा घात केला शेवटी ती भुमिका सस्पेंन्स असल्याने विशिष्ट राजकीय जाणकार वगळता तो कायम आहे तो संस्पेन्स….!
पराभवाच्या चिंतनातुन त्या व्यतीत झाल्या नाहीत किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचा द्वेष मनात ठेवला नाही तर कार्यकर्ते व पक्ष नेतृत्वा मध्ये सुसंवादाचा “सेतु” उभारला गेला आजही त्या मतदारसंघात पुर्णवेळ सक्रीय आहेत पक्षाचे ध्येय,धोरणं, विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांना न्याय देण्यासाठी त्या झटत आहेत.
आणी असे नेतृत्व या आधी मतदारसंघात एवढ्या सक्रियतेने लाभले नसल्याची भावना व्यक्त होत आहे…!
सोबत दुरदुष्टी व नियोजनबद्ध पद्धतीने समाजकार्य करत राजकीय वलय निर्माण करणारे ज्ञानेश्वरदादा पाटिल यांचे देखील नेतृत्व या मतदारसंघात नव्या राजकीय पर्वाचे वातावरण निर्माण करणारे ठरले आहे.
अर्थात काॅग्रेस विरूद्ध काॅग्रेस या गटा-तटाच्या सामन्याला नाना व ताईंच्या नेतृत्त्वात पुर्णविराम लागला एवढे मात्र निश्चित….!
आज या दोन्ही सक्षम नेतृत्वांना घडविणारे माजी.केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांचा वाढदिवस त्या अनुषंगाने त्यांचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन तसेच नाना व ताईंच्या नेतृत्त्वात जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघात त्यांची स्वप्नपुर्ती होवो हि सदिच्छा….!!!

गोविंद अंबुसकर,
(लेखक अभ्यासू पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत)