Home Breaking News ठेकेदार अमित काळकर याची अवैध रेती रॉयल्‍टी वाहतूक पासेस बंद करावी

ठेकेदार अमित काळकर याची अवैध रेती रॉयल्‍टी वाहतूक पासेस बंद करावी

284

विठ्ठल निंबोळकर / सिनिअर रिपोर्टर

शहेजाद खान सलीम खान यांची जिल्‍हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
संग्रामपूर ः ठेकेदार अमित काळकर यांचे कडून अवैध पध्दतीने सुरु असलेल्या रेती रॉयल्टी वाहतूक पासेस बंद करुन ठेकेदार अमित काळकर यांना काळया यादीत टाकावे व दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी एमआयएमचे शहेजाद खान सलीम खान यांनी एका निवेदनाद्वारे जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे केली आहे.
निवेदनात नमुद आहे की, नांदुरा-शेगाव व संग्रामपुर तालुक्यातील जिगाव, पातुर्डा, देऊळगाव व नागझरी या शिवारात सन २०१८ मध्ये अवैध पध्दतीने साठा केलेल्या ५९७३ ब्रास गौणखनिज रेती साठा महसूल प्रशासनाने जप्त केला होता. व हा साठा नियमाप्रमाणे हर्रशी करुन अमित काळकर यांना विक्री करुन रॉयल्टी वाहतूक पासेस देण्यात आले होते. दरम्यान रेतीसाठा उचलण्याची काळ मर्यादा संपल्या कारणाने ४३०५ ब्रास रोंयल्टी वाहतूक पासेसवर महसूल प्रशासनाने बंदी घातली होती. या विरोधात अमित सखाराम काळकर हे मा. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे
याचीका दाखल करुन या विषयी दाद मागीतली होती. त्यावर निर्णय होऊन ४३०५ ब्रास रॉयल्टी वाहतूक पासेस २ महिन्यांकरीता मुदतवाढ देण्याचे मा. उच्च न्यायालय नागपूर कूळ खंडपिठ यांचे कडून महसूल प्रशासनाला आदेशित करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये जिगांव – २८७ ब्रास,पातुर्डा – ६९, ब्रास देऊळगाव – ५८६ ब्रास ,नागझरी -२७३७ ब्रास याची रॉयल्टी वाहतूक पासेस देण्यात आलेल्याआहेत. वास्तवीक पाहता ठेकेदार अमित सखाराम काळकर यांनी जिगाव, पातुर्डा,देऊळगाव व नागझरी या ठिकाणाहून काही रॉयल्टी वाहतूक पासेस वर काही अवैधरित्या रेती साठा २५/०९/२०२० पर्यंत उचल केला आहे. मी प्रत्यक्षात वरिल ठिकाणी भेट दिली असता आज रोजी तेथे रेती साठा उपलब्ध नाही. असे असतांनाही ठेकेदार अमित काळकर हे रेती वाहतूक पासेसबाजारात विकत आहेत. आणि या रेती वाहतूक पासेसच्या माध्यमातून नदी मधून किंवा अन्य ठिकाणाहून वाहन धारक रेतीची चोरी करुन अवेध पध्दतीने रेती वाहतूक करुन या पासेस चा वापर करीत आहे. ही माहिती खनिकर्म व महसूल विभागातील अधिकारी ,कर्मचाऱ्यांना,असूनही ते ठेकेदारांसोबत साटेलोटे करुन पाठीशी घालत आहेत.हे प्रकरण माहीत पडल्याची माहीती त्याला मिळताच त्याने वेग वेगळया वाहनांच्या क्रमांकानुसार एका कंपनीचे नावे रेती वाहतूक पासेस जारी केल्या आहेत. ज्या वाहनांच्या नावे.रेती वाहतूक पासेस जारी केल्या आहेत त्यामधील काही वाहन बुलडाणा जिल्‍ह्यात पण नाही. त्‍या वाहन धारकांना माहित सुध्दा नाही की त्यांचे वाहन क्रमांकाने रेती वाहतूक पासेस जारी केली’गेली आहे. यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असून व सर्रस पणे खनिकर्म विभागा कडूनमाःउच्च न्यायालयाच्या आदेशाने जारी केलेल्या रेती वाहतूक पासेसने अवैध पध्दतीने उपयोगकेला जात आहे,करीता जिगाव,पातुर्डा,देऊळगांव व नागझरी घटनास्थळीचे आपण तात्काळ माहीती उपलब्ध करुन उर्वरीत राहीलेल्या रेती वाहतूक पासेस जप्त करण्यात यावे व प्रकरणाची चौकशीकरुन ठेकेदार अमित काळकर यांचेवर कार्यवाही करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे व दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी एमआयएमचे शहेजाद खान सलीम खान यांनी एका निवेदनाद्वारे जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे केली आहे.