Home Breaking News गुंजकर एज्युकेशन येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकनंदजी जयंती साजरी

गुंजकर एज्युकेशन येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकनंदजी जयंती साजरी

109

खामगाव – प्रा रामकृष्णजी गुंजकरसर यांच्या जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स व गुंजकर आर्टस् कॉमर्स & सायन्स ज्युनिअर कॉलेज आवार येथे काल 12 जानेवारी रोजी माँ साहेब जिजाऊंची 423 जयंती व स्वामी विवेकानंदजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुंजकर एज्युकेशन हबचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामकृष्णजी गुंजकर सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डी एस जाधव,
प्रा सौ सुरेखाताई गुंजकर,
प्रा राजेशजी बनकर, शाळेच्या मुख्याध्यापिका
प्रा सौ अपर्णाताई बनकर, उपमुख्याध्यापक प्रा. अल्हाट , होते. यावेळी सर्व प्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अल्हाट यांनी केले. यावेळी प्रा रामकृष्णजी गुंजकर अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की,राजमाता राष्ट्रमाता जिजाऊं यांनी कशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लहानपणा पासून संस्कार केले व स्वराज्य निर्माण करण्याची ज्योत प्रज्वलित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. गोर गरीब जनतेच्या मनात सुरक्षा आणि मायेची फुंकर घालून रयतेचा आत्मविश्वास वाढवला व अन्याय अत्याचार करणाऱ्या क्रूर दुष्टांपासून रयतेचे रक्षण केले,व स्वराज निर्माण करण्याची उमेद त्यांच्यामध्ये जागृत करून स्वराज्य निर्माण केले.आपण जर इतिहासाची प्रत्येक पान चाळली* तर नक्कीच आपल्याला इतिहासाच्या प्रत्येक पानातून आपण ज्या क्षेत्रात काम करत असाल त्यामध्ये नक्कीच अजून चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा मिळेल एवढी शक्ती इतिहासाच्या पानांत व महापुरुषयांच्या संघर्षात आहे ,व बोलतांना
“उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका”
या विचाराचे
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.तसेच
प्रा डी एस जाधव यांनी माँ साहेब जिजाऊ यांचा हिंदवी स्वराज्य व रयतेसाठी केलेला संघर्ष बोलतांना सांगितला.
प्रा राजेशजी बनकर यांनी त्यावेळी सुद्धा माँ साहेब जिजाऊ यांनी महिलांच्या रक्षणासाठी व स्वाभिमानासाठी कशाप्रकारे कार्य केले व छत्रपती शिवबांना घडवून स्वराज निर्माण करून प्रत्येकाला स्वाभिमानाने जीवन जगण्याचे स्वतंत्र मिळवून दिले याची माहिती दिली. यावेळी इयत्ता 9 वी ची विद्यार्थीनी कु. आचल हिवरकर हिने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान करून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
कू गायत्री निंबाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ ज्योती मोरे यांनी केले.
_______________________