Home मुंबई सुवर्णमयी व्यक्तिमत्वाचे धनी : अनंतराव उंबरकर

सुवर्णमयी व्यक्तिमत्वाचे धनी : अनंतराव उंबरकर

126

 

संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे नांदुरा येथील सुप्रसिद्ध सराफा व्यावसायिक श्री महालक्ष्मी अलंकार केंद्राचे संचालक अनंतराव उर्फ मनुभाऊ उंबरकार यांना द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिषठेचा प्रेमाभक्ती पुरस्कार जाहीर झाला.बुलडाणा जिल्ह्यातील उमाळी ता मलकापूर येथे जन्मलेल्या मनुभाऊंनी प्रामाणिकपणा, मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर नागरिकांचा विश्वास संपादन करीत आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढविली. सर्वांविषयी आपलेपणाची भावना व वाणितील गोडवा जोपासत विविधांगी गुणांच्या जोरावर बालाजीची पावननगरी नांदुरा ही आपली कर्मभुमी मानून यशस्वीरित्या कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर चे वतीने आदरणीय भाऊंना राष्ट्रीय स्तरावरील प्रेमाभक्ती पुरस्कार येत्या 15 जानेवारी रोजी नागपुरात राष्ट्रीय महिला संत नामवंत प्रबोधनकार अंजलीताई अनासाने यांचे हस्ते मान्यवर विभूतींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
आदरणीय भाऊंचे वडील श्री त्र्यंबकराव उंबरकर व आई सौ कोकीळाबाई असून वडील शिक्षक म्हणून नोकरी करत असल्याने नांदुरा येथे स्थायिक झाले. मनुभाऊंनी आपले प्राथमिक शिक्षण नांदुरा येथेच पूर्ण केले.प्रारंभी आर्थिक स्थिती जेमतेम होती. पण सोनार समाजात जन्मल्याने प्रारंभी स्वर्णकार कारागीर म्हणून त्यांनी अलंकार घडवण्याला सुरूवात केली. सोन्या,चांदीचे दागिने घडवण्याची कला त्यांना अवगत झाली. त्यातील बारकावे टिपत मेहनत,जिद्द,चिकाटी,प्रामाणिकपणामुळे पुढे पुढे नांदुरा शहरासह पंचक्रोशीतील ग्राहक बंधू भगिनींमध्ये दृढ विश्वास निर्माण केला.छोटीशी दुकान लावून सोनेरी कारागीरी करत करत पुढे या धंद्यात जम बसला. त्यामुळे सध्या सोनारगल्ली म्हणून ओळख असलेल्या श्री महालक्ष्मी अलंकार केंद्राची जागा विकत घेतली.त्या जागेवर बांधकाम करून भव्य सोन्या चांदीचे शोरूम उभारले. ग्राहकासोबतच सोन्या चांदीचे व्यापारी बांधवांमध्येही सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. मग व्यापारी अकोला,अमरावती,नागपूर,मुंबईचे असो वा दिल्ली किंवा झारखंड,मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातील असो, सगळ्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध निर्माण झालेले आहेत. एक व्यापारी म्हणून त्यांनी ग्राहकामध्ये चांगली विश्वासार्हता निर्माण केली.बघता बघता बुलडाणा जिल्ह्यानंतर त्यांनी आता जळगाव खा.जिल्ह्यातील रावेरला सुध्दा सोन्या चांदीचे भव्य दालन सुरू केले.थाटात शुभारंभ झाला. हे शो रूम ग्राहकांच्या सेवेत भाऊंचे मार्गदर्शनाखाली नियमित सुरू झाले आहे.
नांदुर्यात आले की, भाऊंचे दुकानाला भेट दिल्याशिवाय ग्राहक पुढे जात नाहीत.नातेवाईक व मित्र परिवारातील सदस्यांची आस्थेने विचारपूस करून अडीअडचणी सोडवण्यास भाऊ नेहमी मदत करतात. त्यांना योग्य सल्ला देतात.चांगली कामे करा, प्रामाणिक राहा,यश हे निश्चित मिळते,असे आदरणीय भाऊ नेहमी सांगत असतात,नुसते सांगत नाही तर स्वतः नियमाचे पालन करतात.
प पू संत नरहरीबाबा भालेगावकर हे भाऊंचे नातेवाईक होते.नरहरीबाबांची किर्ती व अनुभूती जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर भक्तांना आहे.नरहरीबाबांच्या विचाराचे आचरण करत आई कोकीळाबाई ह्या सतत भाऊंनाही नरहरीबाबांचे उपदेशानुसार कार्य करण्याचे सांगत असतात.
ज्या समाजात जन्मलो,त्या समाजासाठी काही देणं लागत,या उदात्त हेतूने आदरणीय भाऊ सतत समाजातील गोरगरिबांना ते श्रीमंत बांधवाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी झटत असतात.विशेषतः बेरोजगार तरूणांना योग्य मार्गदर्शन करून सराफा व्यवसाय किंवा आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी योग्य मार्गदर्शनासह सर्वतोपरी मदत करतात.समाजातील प्रत्येकांचा आपला आर्थिक स्तर उंचवावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले कर्मउपासक श्री अनंतरावजी उंबरकर व आई सौ कोकीळाबाई त्र्यंबकराव उंबरकर नांदुरा या मायलेकांना नागपुरात एकाच व्यासपिठावर गौरवण्यात येणार आहे, ही परिवार व चाहत्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. या दोघांनाही द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूरचा मानाचा पुरस्कार जाहिर झाला. शुक्रवारी 15 जानेवारी रोजी नागपुरात साई सभागृहात त्यांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण होईल. यानिमित्ताने माझ्या परिवारासह,पत्रकार बांधवाचे वतीने खुप खुप शुभेच्छा व भाऊंचे हातून पुढेही सातत्याने समाजसेवा घडत राहो,हीच सदिच्छा!
-अनिल उंबरकर
अध्यक्ष प्रेस क्लब शेगाव
9404009625/7083709625
ईमेल : anilumbarkar77@gmail.com
व्यंकटेश नगर शेगाव जि बुलडाणा
444203