पोलिस कारवाईनंतरही पतंगबाजांची मनमानी
खामगाव : नायलॉन मांजामुळे परवा नागपूर मध्ये एका युवकाचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात जीवघेण्या नायलाॅन मांजाचा विक्री, वापर करणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. दरम्यान खामगाव शहरात अशी कारवाई झाल्यावर सुद्धा मांजाची सर्रास विक्री आणि वापर होत आहे. विघातक गोष्टींना प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांचेच असहकार्य करत असल्याचे आज दिसून आले आहे.
नागपूर येथे दोन दिवसांपूर्वी प्रणय ठाकरे या २१ वर्षीय तरुणाचा नायलाॅन मांजामुळे गळा चिरुन तडफडून मृत्यू झाला. या घटनेतूनही काही पतंगबाज तरुणांनी कोणताही बोध घेतला नसून नायलॉन मांजाचा वापर करीत प्लासटिकच्या पंतग आकाशात उडवल्या जाताना दिसतात. खामगाव पोलिसांनी पंतगबाजांना धडा शिकवििण्यासाठी नायलॉन मांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच कारवाई करून दोन दिवस आधी गुन्हा दाखल सुद्धा केला आहे.
आज मकर संक्रांतीच्या पर्वावर या पतंगबाजांवर बारिक लक्ष् राहणार आहे.नायलॉन मांजाचा वापर करणा-या या तरुणावर मनुष्य हत्येचा प्रयत्न,अश्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्याची मागणी समोर आली. नागरिकांच्या गच्चीवर देखील आकस्मिक तपासणी करण्याची मागणी संत्पत नागरिक करीत आहेत.
नायलॉन मांजाला अडकून राज्यात अनेक जणांचा मृत्यूही झाला आहे. ही अत्यंत दु:खद बाब असून यादृष्टीने पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. नायलॉन मांजा विक्री करणा-यांसह नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणा-यांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नायलॉन मांजा कारवाई साठी पोलीसानी पुढाकार घेतला असून बुलडाणा जिल्ह्यातील पहिली कारवाई खामगाव मध्ये झाली. मात्र शहरातील लोकसंख्येचा विचार करता पोलिस कारवाई सर्वच ठिकाणी शक्य नसल्याने या सर्वप्रक्रियेमध्ये लोकसहभाग आवश्यक आहे
समाजात नायलॉन मांजाचा वापर न करण्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगावे. सुती मांजाचा वापर करून पतंग उडवित असले तरी गर्दीच्या ठिकाणी टाळावे. बाहेर मैदानातच पतंग उडवावी. रस्त्यावर मांजा अडकणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
नायलॉनच्या मांजाचा वापर करण्यास जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार बंदी आहे. खामगाव शहरात आम्ही याबाबत कारवाई सुध्दा केली आहे. नायलॉन मांजा संदर्भात कारवाईला गती दिली जाणार असून नागरिकांना तसेच तरुणांना नायलॉन मांजाचा वापर करू नये. नायलॉनच्या मांजाचा विक्री, वापर केल्यास कारवाई केली जाईल.
– अरविंद चावरीया
जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा