१७ सदस्यांचे भाग्य मतदानपेटीत बंद!
पिंपळगाव राजा ग्रामपंचायत निवडणुकीत ७२ टक्के मतदान
पिंपळगावराजा : तालुक्यातील अगदी संवेदनशिल आणि मतदारसंघाचे निर्णायक म्हणून ओळख असलेल्या १७ सदस्यीय ग्रामपंचायत निवडणूकित आज एकूण सहा प्रभागामध्ये सायंकाळपर्यंत ७२ टक्के मतदान झाले आहे.आज सकाळ पासून च मतदार राजा मतदान करण्यासाठी बाहेर पडला.अतिशय चुरशीच्या व निर्णायक असलेल्या या ग्रामपंचायत च्या निवडणुकीत एकूण १७ सदस्यांच्या भाग्याचा फैसला मतपेटीत बंद झाला आहे.
या अतिसंवेदनशिल ग्रा. पं. निवडणुकीत दरम्यान अनेक वॉर्डात विविधांगी पँनल, अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे कुठल्याही पँनलच्या उमेदवारांना आपला विजयाचा दावा करणे कठीण झाले आहे. तर अनेक वर्षांपासून सत्तास्थनी असलेल्या शेख चांद यांच्या परिवारासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक सुशिक्षित युवा उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे आणि त्यांच्याकडून गावाच्या सर्वांगिण विकासाची ग्वाही दिल्या जात असल्याने त्यांच्याकडे मतदात्यांचा कौल सर्वाधिक दिसून येत होता.त्यामुळे येणाऱ्या काळात या गावाचे सर्वांगिण विकासाचे स्वप्न कोण पूर्ण करू शकतो किवा सुज्ञ मतदाते कोणत्या उमेदवाराला आपली पसंती देतात,हे येणाऱ्या सोमवारी समजेल.त्यावरच या ग्रा. पं. चे अस्तित्व अवलंबून आहे, एवढे मात्र निश्चित.
————-
जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या नकाशावर लाल बत्तीत अतिसंवेदनशिल म्हणून पिंपळगावराजा या गावाची नोंद आहे.आज पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तत्पूर्वी ठाणेदार सचिन चव्हाण यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत पिंपळगाव राजा परिसर पिंजून काढला होता. यामध्ये पोलीस कर्मचारी, कमांडो व पोलीस अधिकारी यांचा समावेश होता.