प्रा. राजेश तायडे / पुणे जिल्हा बातमीदार
पुणे : महाराष्ट्रात जेव्हा पासुन महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा पासुनच हे सरकार पडणार अशी टीका सातत्याने भारतीय जनता पक्ष करत आला होता. पन हे होणार नसल्याचे स्पष्ट होताच हे सरकार निवडणुकीत टीकु शकणार नाही अशी वल्गना भारतीय जनता पक्षाचे नेते करु लागले होते. पन नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक आमदारकीची निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस याच्या महाविकास आघाडीने ऐकी दाखवुन दिली आणि 6 पैकी 4 जागा जिंकल्या आणि भारतीय जनता पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधानी होण्यास भाग पाडले.
आणि कालच ABP या वाहिनीने एक लोकप्रियताचा Online Poll घेतला त्या मध्ये प्रत्येक राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात त्या त्या राज्यातील मुख्यमंत्री असा सामना होता.
आणि त्याच Online Survey मध्ये महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा सामना पहिल्यांदाच होणार होता.
महाराष्ट्र राज्य सर्व्हे निष्कर्ष
CM ( उद्धव ठाकरे ) – 58%
PM ( नरेंद्र मोदी ) – 47%