Home राजकारण 91 पैकी 63 ग्रापंवर काॅंग्रेस महाविकास आघाडी विजयी : राणा दिलीपकुमार सानंदा

91 पैकी 63 ग्रापंवर काॅंग्रेस महाविकास आघाडी विजयी : राणा दिलीपकुमार सानंदा

177

 

भाजपाने केवळ 11 जागा जिंकल्याचा दावा

माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या जनसंपर्क कार्यालयावर जल्लोश

खामगांव:- ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा मानल्या जाणा-या ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल 18 जानेवारी रोजी जाहीर झाला असून खामगांव विधानसभा मतदार संघातील मतदारांनी काॅंग्रेस महाविकास आघाडीच्या बाजुने कौल दिला असून 91 पैकी 63 जागांवर काॅंग्रेस महाविकास आघाडी प्रणित उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजप प्रणित पॅनलच्या उमेदवारांना मोठया प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला असून त्यांना फक्त 11 जागा राखत्या आल्या आहेत. काॅंगे्रस महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर विजयाचा जल्लोश साजरा केला.
खामगांव विधानसभा मतदार संघातील खामगांव तालुक्यातील 71 ग्राम पंचायती व खामगांव मतदार संघात समावेष असलेल्या षेगांव तालुक्यातील 20 अष्या 91 ग्राम पंचायतीसाठी निवडणुका घोशित झाल्या होत्या. या पैकी खामगांव तालुक्यातील 4 ग्रामपंचायती हया अविरोध झाल्याने उर्वरीत 87 ग्राम पंचायतीच्या जागेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. मतदानानंतर निकालाची प्रतिक्षा लागुन होती. 18 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता पासुन न.प.षाळा क्रं.6 मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी करीता 24 टेबल लावण्यात आले होते. त्यामुळे निकाल लवकर घोशीत झाले. खामगांव तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये मतदारांनी काॅंग्रेस महाविकास आघाडीच्या बाजुने मतदान केल्याने या निवडणुकीत काॅंग्रेस महाविकास आघाडीने आपले वर्चस्व स्थापीत केले आहे. खामगांव तालुक्यातील 71 पैकी 47 ग्राम पंचायमध्ये काॅंग्रेस महाविकास आघाडी समर्थित पॅनलने विजय प्राप्त केला असुन या ठिकाणी बहुमत मिळाल्याने 47 ग्राम पंचायतीवर काॅंग्रेस महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. तर खामगांव तालुक्यात भाजपाला फक्त 10 ग्राम पंचायतीच्या जागा राखत्या आल्या आहेत तर 4 ग्राम पंचायतींवर भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार विजयी झाले असुन खामगांव-शेगांव तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीने विजय संपादन केला आहे. त्यातही काॅंग्रेस विचार सरणीचे उमेदवार मोठया प्रमाणात विजयी झाल्या असल्याने हया जागा संभ्रमावस्थेत आहे, माहिती काँगेसने प्रसिद्धीस दिली आहे.

सोमवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे येवुन जल्लोश साजरा केला.

काँग्रेसल मिळाले 71 ग्रापवर यश

खामगांव नजीक असलेल्या सुटाळा खु, सुटाळा बु.,जनुना,पारखेड,वाडी हया गावांमध्ये सुध्दा महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिध्द करुन विजय मिळविला आहे. खामगांव तालुक्यातील 71 ग्राम पंचायतीपैकी पाळा,पिंपळगांव राजा, उमरा अटाळी, सुटाळा खुर्द, सुटाळा बु.,गारडगांव, हिवरा बु., चितोडा,लांजुड, वाडी, लाखनवाडा बु.,आंबेटाकळी, शीरजगांव देशमुख, विहिगांव, ज्ञानगंगापूर,चिंचपूर,पातोंडा,षिर्ला नेमाने, टेंभुर्णा,टाकळी, गणेषपूर, लाखनवाडा खुर्द, कोलोरी, कंझारा, चितोडा, वर्णा, भालेगांव,निपाणा, अडगांव, पोरज, कुंबेफळ, पिंप्री देशमुख, बोथाकाजी, कदमापूर, सुजातपुर, वाकुड, दधम, खोलखेड, काळेगांव,पळशी बु., जनुना तर शेगांव तालुक्यातील माटरगांव, जलंब,जानोरी, भोनगांव, वरुड, गौलखेड, सांगवा, तरोडा कसबा, बेलुरो, टाकळी विरो, शीरजगांव निळे, गव्हाण,तिंत्रव या ठिकाणी काॅंग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय संपादन केला असुन या उमेदवारांनी जनसंपर्क कार्यालयावर येवुन सानंदांच्या हस्ते सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे या ग्राम पंचायतीवर काॅंग्रेस महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे.

भाजपाच्या ताब्यात ११ ग्रामपंचायत

खामगांव मतदार संघात भाजपाने संभापुर,पिंप्राळा, शेलोडी, ढोरपगांव,बोरजवळा, पिंप्री गवळी, जळका भंडग, कंचनपूर, शाहपुर, व शेगांव तालुक्यातील डोलारखेड, भास्तन या 11 ग्रामपंचायत भाजपाला राखत्या आल्या आहेत. भारिपने कारेगांव बु.,अंत्रज, अंबिकापुर, बोरी हया ठिकाणी विजय संपादन केला आहे.

ही विजयाची सुरुवात: सानंदा

2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाचा सफाया झाला असून ही तर महाविकास आघाडीची विजयाची सुरुवात आहे. भविश्यात होणा-या जि प , पंचायत समिती, बाजार समिती, नगर पालीका सह लोकसभा,विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचाच विजय होईल असा विश्वास सानंदांनी व्यक्त केला.