Home राजकारण खामगाव मतदारसंघात भाजपा मोठा पक्ष : तालुकाध्यक्ष गव्हाळ आणि भालतडक यांचा दावा

खामगाव मतदारसंघात भाजपा मोठा पक्ष : तालुकाध्यक्ष गव्हाळ आणि भालतडक यांचा दावा

167

 

खामगाव :- ग्रामपंचायत निवडणुकीत खामगाव मतदार संघात भाजपाचा वरचसमा राहिला असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. खामगाव मतदार संघाचे आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे मार्गदर्शनात मतदार संघातील खामगाव व शेगाव तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणूक पक्षाने ताकदीने लढली. खामगाव मतदार संघातील 72 ग्रामपंचायत मधील 42 ग्रामपंचायत वर भाजप समर्थ पॅनल बहुमताने निवडणूक आले आहे. इतर काही ग्राम पंचायत मध्ये सुद्धा कार्यकर्यांच्या इच्छेनुसार भाजप सत्ता स्थापन करेल अशी आशा भाजप खामगाव तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ यांनी व्यक्त केली आहे. तसेच मतदार संघातील शेगाव तालुक्यातील 36 पैकी 16 ग्राम पंचायत वर एकतर्फी विजय मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे विकासाचे राजकारण पाहून आणखी काही त्रिशंखु निर्णय आलेल्या ग्राम पंचायत वर सुद्धा भाजपचा झेंडा फडकविला जाणार असल्याची माहिती भाजपा शेगाव तालुकाध्यक्ष विजय भालतीडक यांनी दिली. सकाळी 9 वा निवडणूक निकाल लागेपासूनच भाजप कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते करण्यात आला. भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, जिल्हा सचिव संजय शिनगारेतालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, तालुका सरचिटणीस शांताराम बोधे, डॉ एकनाथ पाटील, जी प सदस्य डॉ गोपाल गव्हाळे, प स सदस्य विलास काळे, तुषार टिकार, रामेश्वर बंड, राजेश तेलंग, तुषार गावंडे,हरसिंग साबळे, न प आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार, नगरसेवक सतीशअप्पा दुडे, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विध्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, लाला महाले,विजय महाले, समाधान मुंडे, अंबादास उंबरकार, ज्ञानदेवराव चिमनकार, आदी पदाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. सकाळ पासूनच विजयी उमेदवार व भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालय आणि कार्यालयासमोर गुलाबी , हिरवा,व निळ्या गुलालाची उधळण करून जल्लोष केला.