Home राजकारण जिल्ह्यात 50 टक्के ग्रामपंचायत वर भाजपचे वर्चस्व :जिल्हाध्यक्ष आ. अँड आकाशदादा फुंडकर

जिल्ह्यात 50 टक्के ग्रामपंचायत वर भाजपचे वर्चस्व :जिल्हाध्यक्ष आ. अँड आकाशदादा फुंडकर

227

ग्रामीण जनतेचा भाजपलाच कौल, महाविकास आघाडी फॉर्म्युला फेल झाल्याचा भाजपने केला दावा

खामगाव::- ग्रामपंचायत निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून जिल्ह्यातील 50 टक्के ग्रामपंचायत वर भाजपचा झेंडा फडकला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. अँड आकाशदादा फुंडकर यांनी हा यशस्वी दावा केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायत निवडणूकिसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. भाजपने सर्व ठिकाणी आपले समर्थीत पॅनल उभे केले. आज 18 जानेवारी रोजी निवडणूकीचे निकाल लागले. संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागातील शेतकरी , शेतमजुरांना भाजप समर्थीत उमेदवारांना भरगोस मत दिली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून माहिती घेतली असता सुमारे 275 ग्राम पंचायत वर म्हणजेच जिल्ह्यात 50 टक्के ठिकाणी भाजप समर्थीत उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. सरपंच पदाच्या निवडणुकीपर्यंत हा आकडा अजून वाढणार आहे.भाजपचे जेष्ठ नेते चैनसुख संचेती, माजी मंत्री आमदार डॉ संजयजी कुटे, आमदार सौ स्वेताताई महाले व इतर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या समर्थ साथीने जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच मोठ्या संख्येने झालेल्या या निवडणूकित जिल्ह्यात भाजप आपल्या संपूर्ण ताकदीनिशी लढला व त्यात चांगले यशसुद्धा मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. निवडणूक निकाल आल्यानंतर भाजपच्या सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी निवडून आलेल्या उमेदवारांचा भव्य सत्कार कार्यक्रम प्रत्येक तालुकास्तरावर करून गुलाल उधळून जल्लोष केला. खामगाव मतदार संघातील खामगाव व शेगाव तालुक्यातील निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार भाजप कार्यालय खामगाव येथे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचेशुभहस्ते करण्यात आला. भाजप पक्षाने स्वतःच्या जोरावर विकासाचे राजकारण करून सर्व पक्षांना जिल्ह्यात मागे टाकले असून ग्रामीण जनतेचे आ. अँड आकाशदादा फुंडकर यांनी आभार मानले आहे.

ग्रामीण जनतेचा भाजपवरच विश्वास::- आ. आकाशदादा फुंडकर

ग्रामीण भागातील जनतेची नाळ भाजपशी जुळलेली आहे. शेतकरी , शेतमजुरांना प्राधान्य देऊन भाजप त्यांचे विकासासाठी सदैव काम करते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, ग्राम पंचायत निवडणूक सुद्धा भाजप विरोधात सर्व पक्ष सोबत येऊन लढावे लागत आहे, तसे तर यातच भाजपचा विजय आहे परंतु बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीण जनतेने भाजपला मोठा दिलेला कौल पाहून शेतकरी, शेतमजूर ,ग्रामीण जनता भाजपालाच आपला सच्चा विश्वासू राजकीय पक्ष मानतात. जिल्ह्यात महाविकास आघाडी फॉर्म्युला फेल झाला असून भाजपचं सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यापुढेही ग्रामीण जनतेचा भाजपच्या पाठीशी भक्कमपणे राहील असा विश्वास निवडणूक निकालानंतर भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांनी दिली आहे.