Home Breaking News बापरे! राज्यातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह!

बापरे! राज्यातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह!

84

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. शिवाय, संपर्कात आलेल्यांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

आज माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी करोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.” असं अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

२१ टक्क्यांहून अधिक जणांना यापूर्वीच करोनाची लागण

दरम्यान, देशातील १० वर्षे अथवा त्याहून अधिक वयोगटातील २१ टक्क्यांहून अधिक जणांना यापूर्वीच कोविड-१९ ची लागण झाल्याचे आढळून आले आहे, असे आयसीएमआरने अलीकडेच केलेल्या सीरो सर्वेक्षणात म्हटले आहे, असे गुरुवारी सरकारने जाहीर केले. त्याचप्रमाणे करोनाची सहज लागण होण्याचे प्रमाणही मोठे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राज्यात शुक्रवारी देखील दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. आज दिवसभरात राज्यात २ हजार ६२८ नवीन करोनाबाधित वाढले तर, ३ हजार ५१३ रुग्णांनी करोनावर मात केली. आतापर्यंत राज्यभरात एकूण १९ लाख ५२ हजार १८७ जण करोनामुक्त झाल्याने, त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७६ टक्के झाले आहे. तर, सध्या राज्यात ३३ हजार ९३६ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. शिवाय, संपर्कात आलेल्यांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. ” माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी करोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.”असं त्यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.