खामगाव :भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांच्या विकासकार्यावर आधारित द रिपब्लिक महाराष्ट्र “विकासयात्री ” पुस्तकाचे विमोचन होणार आज पार पडले. आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून साकारलेल्या या विशेष पुस्तकाचे विमोचन त्यांचे शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत माधव नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात सकाळी १० वाजता थाटात करण्यात आले. या पुस्तकासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष शुभेच्छा पत्र देवून आमदार आकाश फुंडकर यांच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
अश्या आहेत शुभेच्छा..!
खामगाव मतदारसंघाचे आमदार श्री आकाश फुंडकर हे राज्याच्या राजकारणातील तरुण उमद्याआमदारांपैकी एक आहेत. त्यांचे वडील आणि राज्याचे मा. कृषिमंत्री श्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या मुशीतून ते तयार झाले असल्याने त्यांना व्यापक जनहिताची चांगली जाण आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी निर्णयक्षमतेबरोबरच जिद्द, संयम, अभ्यास आणि समाजासाठी अविरत कार्य करण्याची तयारी असावी लागते. या सर्व गुणांचे योग्य मिश्रण श्री आकाश यांच्यात आहे.
कोरोनाच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता शेकडो कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी केलेले काम विलक्षण. कोरोनाच्या महासंकटात एकही कुटुंब उपाशी किंवा उपचाराविना राहणार नाही, अडचणीत ते एकटे पडणार नाहीत, यासाठी आकाश फुंडकर आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते सदैव कार्यरत राहिले.
एकीकडे कोरोनाच्या महासंकटाशी मुकाबला करीत असतानाच दुसरीकडे अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कार्य ते करत होते.
त्यांचे वडील माजी कृषिमंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचा कृषी आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा वारसा आमदार आकाश फुंडकर अतिशय तडफदारपणे चालवत आहेत.
यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा आणि नुकसानीची आणेवारी वस्तुनिष्ठ काढण्यात यावी यासाठी बुलढाणा जिल्हा भाजपा कार्यकरत्त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली केलेले चूनभाकर आंदोलन विशेष प्रभावी ठरले. वडिलांचा राजकारणाचा वारसा असला तरीही स्वकर्तुत्वाने पुढे गेलेल्या एका कार्यकर्त्याने आपल्या बांधवांसाठी, सामान्यांसाठी मदतीचा सेतू उभारणे, त्यामध्ये सातत्य ठेवणे हे काम निश्चितच भारतीय
जनता पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा मला विश्वास आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा!
असे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रात नमूद आहे.
द रिपब्लिक महाराष्ट्रच्या वतीने आमदार ऍड. श्री. आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुस्तक स्वरूपात, आर्ट पेपरवरील ४४ पानांचा बहुरंगी विशेषांक प्रकाशित करण्यात आला असून अंक हवा असल्यास संपर्क करावा असे आवाहन द रिपब्लिक महाराष्ट्र चे संपादक श्रीधर ढगे पाटील व अतिथी संपादक पांडुरंग काळे यांनी केले आहे.
-टीम द रिपब्लिक महाराष्ट्र
www.therepublic.co.in