Home Breaking News विद्यार्थ्यांना पोषण आहार घरपोच !

विद्यार्थ्यांना पोषण आहार घरपोच !

87

शेगाव : कोरोना काळामध्ये सामूहिकरीत्या एकत्र येण्यास बंदी आहे. अशा काळात आहार वितरित करताना कोरोना उद्भवण्याचा धोका आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत शालेय पोषण आहार घरपोच देण्याचा निर्णय झाला आहे. शाळेला प्राप्त होणारा आहार विद्यार्थ्यांपर्यंत शाळांमधून पोहोचविला जात आहे. आहाराच्या माध्यमातून विद्यार्थी सशक्त व्हावे आणि त्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून संपूर्ण आहार शिजविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरीच देण्यात आला आहे. मोठ्या विद्यार्थ्यांना निकषानुसार सदर आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविली आहे. त्याच प्रमाणे छोट्या विद्यार्थ्यांनाही धान्य घरपोच दिले जात आहे.
मागील वर्षीच्या मार्च पासून कोरोनाचे पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू होते,एक वर्षाचा कालावधी उलटला तरीही कोरोनाचे ग्रहण सुटता सुटेना.कोरोनाचा भिती व संसर्ग कमी झाला.पण धोका कायम असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्वकाही सुरळीत सुरू झाल्याने आता माध्यमिक शाळा व काॅलेज सुरू होत आहेत.पण कोरोनाचा धोका लक्षात घेता खबरदारी म्हणून शासनाचा विद्यार्थ्यांना घरपोच धान्य देण्याचा हा निर्णय स्तुत्यच आहे.


घरपोच आहार योजनेतून शालेय विद्यार्थ्यांना धान्याचे वितरण
घरपोच आहार योजनेमधून शालेय विद्यार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे. यामध्ये एक ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दर दिवसाला १०० ग्रॅम तांदूळ, २० ग्रॅम मसूर डाळ, २० ग्रॅम मटकी, तर सहा ते आठच्या विद्यार्थ्यांना ३० गम मसूर डाळ, ३० गम मटकी आणि १५० ग्रॅम तांदळ यानसार घरपोच आहार देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना कोरोना कालावधीपासून घरपोच आहार दिला जात आहे. तांदूळ, मसूर डाळ, मटकी या वस्तू विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यांनी घरीच आहार शिजवावा आणि त्यांचे आरोग्यही जपले जावे म्हणून घरपोच धान्य पुरवठा करण्यात येत आहे. याच नियमांची अंमलबजावणी जिल्हाभरात होत आहे.
-प्रकाश केवट
गटशिक्षणाधिकारी पं स शेगाव