Home राज्य शासकिय नौकर भरतीच्या जाहीरातीत संगणक टंकलेखनाचा उल्लेख येणार

शासकिय नौकर भरतीच्या जाहीरातीत संगणक टंकलेखनाचा उल्लेख येणार

99

संस्था चालकांना व संगणक टंकलेखन प्रशिक्षणार्थीना दिलासा
–अरूण चांडक

खामगाव – शासकीय सेवेतील गट अ, ब, क संवर्गातील पदभरती जाहिरात मध्ये या इंग्रजी, मराठी टंकलेखन परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांची मागणी करण्यात येत होती परंतु शासनाने न २०१३ मधे वरील अभ्यासक्रम टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेवुन त्याऐवजी सन २०१५ पासुन संगणक टंकलेखनाचा नवीन अभ्यासक्रम समकक्ष म्हणुन सुरू केला आहे. त्यास शासन पुरकपत्र क, मातंस२०१२/प्र.क्र.२७७/३९ दि. १६ जुलै २०१८ जी. आर. नुसार संगणक अर्हता म्हणुन मान्यता सुध्दा देण्यात आली होती. परंतु शासनाच्या नौकर भरतीच्या जाहीरातील मात्र उल्लेख येत नव्हता किंवा संगणक टंकलेखन पास झालेल्या विद्यार्थ्यांना नौकर भरतीच्या वेळेस त्याचे प्रमाणपत्र काही शासकिय कार्यालय ग्राह्यमानन्यास नकार दिला. तेव्हा महाराष्ट्र राज्य टंकलेखन व लघुलेखन संघटना, मुंबई तसेच जिल्हा संघटनेने वेळोवेळी शासनाकडून निवेदन देवून वरील गोष्ट लक्ष्यात आणुन दिली. तसेच संघटनेचे महासचिव श्री हेमंत ढमढरे यांनी माहिती अधिक अधिकारात या संबधी विचारना केली असता वरील गोष्ट मान्य करून तसा नवीन जी.आर. काढण्याचे पत्र दिले. त्यानुसार दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी शासन परिपत्र क्र. मातसं १८२०/प्र.क्र.९७/से-५ मुंबई – ३२ नुसार शासनाच्या सेवेसाठी गट-अ.ब.क. संवर्गातील अधिकारी/कर्मचाऱ्यासाठी आवश्यक असणारी संगणक अर्हता म्हणुन शासनाच्या पुरकपत्र क्र.मातंस१८२०/प्र.क्र.९७/से-५/३९ दि. ५/२/२०२१ नुसार मान्यता दिली असुन शासनाच्या सर्व विभाग/कार्यालय/महामंडळे/स्वायक्ता संस्था/उपक्रमे इ. ना. वरील सेवा भरतीच्या वेळेस जाहीरातील संगणक टायपिंगचा उल्लेख असने आवश्यक केले आहे. शासनाच्या ह्या जी. अ र. मुळे शासकिय कार्यालयाचे/पालक वर्गांचे व विद्यार्थ्यांचे संगणक टंकलेखना संबधी असलेले गैर समज दूर झाले असुन. राज्यातील ३५०० संस्था चालकांना दिलासा मिळाला आहे. राज्य संघटनेचे सहसचिव अरूण चांडक, जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम वावगे, सचिव, रवि देशमुख, कार्याण्शक्ष अजय चव्हाण, सौ. कविता शर्मा आदींनी आनंद व्यक्त करण्यात आला आहे.