Home Breaking News वाहतुक सुरक्षा सप्ताह ;पोलिसांचे “रायझिंग डे”

वाहतुक सुरक्षा सप्ताह ;पोलिसांचे “रायझिंग डे”

77
मलकापूर :पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांचे उपस्थितीत दि.18 जाने ते 17 फेब्रु हा  वाहतुक सुरक्षा सप्ताह”रायझिंग डे”राबविणे सुरू असुन यात  नेत्रतपासणी शिबिर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतुक नियमांचे मार्गदर्शन, अपघात टाळण्यासाठी ट्रिपलसीट, फॅन्सी नंबर प्लेट,सिट बेल्ट, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला.
          महिनाभर चालत असलेल्या या सप्ताहात पोलीसांच्या वतीने वाहतुक नियमांविषयी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पालकांनी लहान मुलांचे हातात वाहन न देण्याबाबत च्या सुचना ही पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी शिबीरा दरम्यान दिल्या असुन आज जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन ठोसर, शहराध्यक्ष विरसिंहदादा राजपुत, पत्रकार समाधान सुरवाडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत बसस्थानक, तहसील चौक, हनुमान चौक,चारखंबा चौकातील ॲटो,ट्रॅक्टर,डि.सी.एम, मोटारसायकल,टांगे सह आदी वाहनांना अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर लावण्यात आले यावेळी पो.हे.काॅ शाम शिरसाट,पो.हे.काॅ महेश चोपडे,ना.पो.काॅ गणेश जायभाये,पो.काॅ निलेश तायडे,पो.काॅ चंद्रशेखर ऊबाळे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.