Home Breaking News स्व. भाऊसाहेब फुंडकर स्मृती कृषी सेवा पुरस्कार उद्धव नेरकर,तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर...

स्व. भाऊसाहेब फुंडकर स्मृती कृषी सेवा पुरस्कार उद्धव नेरकर,तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार अनिल उंबरकर यांना जाहीर

83

नरेंद लांजेवार बुलडाणा, सूरज यादव खामगाव यांनाही

श्री गुरुदेव सेवा मंडळाचे राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर

नांदुरा : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ चांदूर बस्वा शाखा यांचेकडून या वर्षी पासून देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रस्ताव सादर केले होते त्यामध्ये काही प्रस्तावावर विचार करून अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे यात
स्व. भाऊसाहेब फुंडकर स्मृती कृषी सेवा कार्य गौरव पुरस्कार जलंब येथील सुरभी संस्थेच्या उद्धव नेरकर यांना तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार -शेगाव येथील जेष्ठ पत्रकार लोकमत तालुका बातमीदार अनिल उंबरकर या जाहीर झाला आहे. राज्यात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना त्याच्या चांगल्या कामासाठी हे पुरस्कार दिले जातात.

यावर्षीही विविध पुरस्कार जाहीर झाले असून त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती जिवनगौरव पुरस्कार -श्री. शालिग्रामजी पवार जेष्ठ प्रचारक चांदूर बिस्वा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कार्यगौरव पुरस्कार- ह.भ.प. गजानन महाराज बोंद्रे राष्ट्रीय किर्तनकार अंजनगाव सुर्जी, डॉ. रखमाबाई राऊत स्मृती वैद्यकीय सेवा कार्य गौरव पुरस्कार- डॉ. शिवनारायण जैस्वाल चांदूर बिस्वा, कर्मयोगी संत गाडगेबाबा जिवन गौरव पुरस्कार – अरूण महाराज नायसे राष्ट्रीय किर्तनकार दहिगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता प्रबोधन सेवा कार्य गौरव पुरस्कार -पंकजपाल महाराज राठोड वाशिम,
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती साहित्य गौरव पुरस्कार -बंडोपंत बोढेकर गडचिरोली, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती शिक्षण सेवा कार्य गौरव पुरस्कार- व्हि.आर.पाटील सर अध्यक्ष चांदूर बिस्वा शिक्षण समिती चांदूर बिस्वा,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय सेवा पुरस्कार- नरेंद्र लांजेवार बुलढाणा, डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम स्मृती प्रशासकीय सेवा पुरस्कार – प्रकाश मुकुंद शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा, शहिद हेमंत करकरे स्मृती पोलिस सेवा पुरस्कार- पी.एस.आय. श्री विठ्ठलसिंग सोळंके अकोला, स्व. गोपीनाथ मुंडें स्मृती ग्रामविकास सेवा पुरस्कार ; प्रशांतजी जामोदे ग्रामविकास अधिकारी चांदूर बिस्वा, कर्मवीर भाऊराव पाटील स्मृती शिक्षण सेवा पुरस्कार -प्रा. निलेश देशमुख नांदुरा, स्व. बाबा आमटे स्मृती समाजसेवा पुरस्कार -श्री सुरज यादव खामगाव
आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार २०२१- अनिल उंबरकर शेगाव, महात्मा फुले स्मृती समता पुरस्कार- गणेश धर्माळे यवतमाळ, यशवंतराव चव्हाण स्मृती अभियंता कार्यगौरव पुरस्कार- धनंजय मिसाळ साहेब नांदुरा, महात्मा गांधी स्मृती सामाजिक एक्य पुरस्कार -आतिकुर रहेमान ( जमिल साहेब) वडनेर भोलजी, वसंतराव नाईक स्मृती वनसेवा पुरस्कार -भुषण देशमुख अकोला, संत तुकाराम महाराज स्मृती वारकरी किर्तन गौरव पुरस्कार – डॉ. संकेत काळे रेवसा,संत नामदेव महाराज स्मृती किर्तन गौरव पुरस्कार – डॉ. पियुष यावले बेनोडा शहिदस्वामी विवेकानंद स्मृती युवा कार्यगौरव पुरस्कार डॉ. राज घुमनार यवतमाळ, राजमाता जिजाऊ महिला कार्यगौरव पुरस्कार – प्रांजली ताई धोरण मलकापूर, साने गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१- बांगडकर सर पारशिवनणी, संत ज्ञानेश्वर महाराज स्मृती कला गौरव पुरस्कार- प्रा. ईश्वर ढोबळे नागपूर, संत तुकाराम महाराज स्मृती संगीत कला गौरव पुरस्कार- भगत सर नांदुरा, आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलूरकर स्मृती प्रबोधन सेवा कार्य गौरव पुरस्कार- सचीन काळे कळमेश्वर, कर्मयोगी तुकाराम दादा गिताचार्य जिवनगौरव पुरस्कार- सेवकराम मिलमिले पंढरपूर,स्व ओ.टी.पाटील स्मृती नाट्य गौरव पुरस्कार- दिनेश गोहत्रे बेलोरा चांदूर बाजार- स्व नामदेव ढसाळ स्मृती विद्रोही साहित्य गौरव पुरस्कार- नरेंद्र नरवाडे बुलढाणा, स्व. भाऊसाहेब फुंडकर स्मृती कृषी सेवा कार्य गौरव पुरस्कार- उद्धव नेरकर जळंब, स्व. भाऊ भालेराव स्मृती साहित्य गौरव पुरस्कार – अनुपकुमार कुलकर्णी, तानुबाई बिर्जे स्मृती पत्रकारिता पुरस्कार -गणेश राऊत मेहकर, मदर तेरेसा स्मृती समाजसेवा कार्यगौरव पुरस्कार -श्री काकपुरे सर यांना जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती तालुका सेवाधिकारी तथा समिती प्रमुख प्रा. किशोर अशोकराव जाधव ,तालुका प्रचारक प्रदिप महादेव तांदूळकर, तालुका सचिव निवृत्ती तायडे, तालुका संघटक समाधान वावगे ,तालुका युवक प्रमुख सुयोग माहुलकर ,तालुका सदस्य सुभाष साबे ,अशोक मापारी, दत्तराज गुजर, गजानन बिचारे ,माणीक पवार, गजानन सातव , यांनी दिली असे प्रसिद्धी प्रमुख रविंद्र पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे