Home विदर्भ गुरुवर्य आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींचा आज वाढदिवस !

गुरुवर्य आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींचा आज वाढदिवस !

89

गुरुवर्य आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजींचा आज वाढदिवस ! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संस्कारांचा वारसा आपल्या पिढीला गुरुजींच्या रुपाने मिळाला आहे . संस्कारदिन म्हणून गुरुजींचा वाढदिवस साजरा केला जातो.
गुरुजी, वाढदिवस अभिष्टचिंतन !

आचार्य पद मिळविणे कठीण असले तरी, अशक्य मुळीच नाही.यासाठी निरंतर साधनेची गरज असते. आचार्य पद प्राप्त करणारा
व्यक्ती सर्वांच्या आदराचे स्थान बनतो. व्यक्तीचे कार्यच त्याला आचार्य पद मिळवून देत असते. आचार्य वेरुळकर गुरुजींचे कार्यचअसे आहेत की, त्यांना आचार्य पद प्राप्त झाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आचरणाला विशेष महत्त्व दिलं आहे.
लोकासि जे जे शिकवावे ।
आधी आपणचि आचरावे ।
नुसते पुढारी म्हणोनि ।
तेणे आदर न वाढे ।।
जगतांना माणसाचं आचरण चांगलं नसेल तर, त्याच्या शब्दांना किंमत कशी लाभणार? त्याच्यापासून कुठे काय धडा
घेणार? माणसाला प्रतिष्ठा कशी लाभणार? आपल्या जगण्याचा आदर वाढणे गरजेचे आहे. अर्थात चांगल्या आचरणाचा प्रभाव असतो, आदर असतो, त्याचा इतरांवर परिणाम होऊ शकतो,त्यातूनच बदल घडतो आणि सुधार होतो, मात्र आचार कसा हवा?तर महाराज म्हणतात. ज्याने सत्याशी नाते जोडले ।
त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आले।
सांगण्याहुनिही सामर्थ्य चाले ।
त्याच्या शुद्ध जीवनाचे ।। जो लोकांच्या मनावर राज्य करतो, त्याला आचार्य म्हटले जाते. आचार्य पदाची प्राप्ती करणारे लोकांच्या विश्वासास पात्रठरतात. आचार्य हे ३६ गुणांनी युक्त असतात. ते वेळ आणि परिस्थिती नुसार लोकांना दिशा देण्यासाठी सक्षम असतात.
त्यांच्या वाणीत, बोलण्यात विलक्षण ताकद असते. त्यांचा शब्द कधीही खाली जात नाही. असेच, आमचे आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी आहेत. त्यांच्या मार्फत संस्कार शिबिरे, किर्तन-प्रवचन शिबिरे चालवून संस्काराची जडणघडण घडवून संस्कारीत मुले आणि मुली घडतात. -(पुरुषोत्तम बैसकर, मोझरीकर)

गुरुजी म्हणतात, खरं बोला..गोड बोला!

‘सत्यं वद; प्रियं वद’ ….खर बोला पण गोड बोला – आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी
“तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला” असे आपण मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सहजतेने बोलून जातो. पण त्याचा नेमका अर्थ शोधायचा प्रयत्न केला असता सामाजिक आरोग्य चांगले रहावे, सद्विचाराची पेरणी व्हावी, हा दृष्टीकोण त्यामागे असल्याचे नांदुरा येथील गुरुदेव सेवाश्रमातील आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी म्हणाले. या माध्यातून चांगले विचार पेरण्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये हा सण साजरा केला जातो. समाजामध्ये आज होणार्या तंट्यांचा विचार करता ८५ टक्के वाद हे केवळ बोलण्यामुळे होत आहे. ते होऊ नये म्हणून चांगले बोलणे व चांगले वागण्याचा आपल्यावर संस्कार व्हावा, ही भूमिका या मागे आहे. कौटुंबिकस्तरावर मुले, आईवडील यांच्यात संवाद होत नसल्याचे दिसते. हा संवाद व्हावा व तो चांगला व्हावा. तो सुसंवाद सुरू झाल्यास कुटुंबासोबतच सामाजिक संवादही चांगला होऊन संस्कारक्षम समाज निर्मिती होईल. त्यासाठीच संस्कृत भाषेतील ह्यसत्यं वद; प्रियंं वदह्ण हे वाक्य आहे. भगवद्गीता, ग्रामगिता, ज्ञानेश्वरीमध्येही त्या अर्थाने लिखान झालेले आहे. संस्काराला महत्त्व दिल्या गेले. त्यामुळे ह्यखर बोला, गोड बोला व सत्य बोलाह्ण असे अभिप्रेत आहे.

सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही.

सत्य बोला पण ते गोड बोला. सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही. त्यामुळे ते सांगण्यासाठी गोड बोला. अनेक जण गोड बोलतात परंतू त्यातून असत्य कथन करता. त्यामुळे गोड बोला पण सत्य बोला.सत्य बोला पण ते गोड बोला. सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही. त्यामुळे ते सांगण्यासाठी गोड बोला. अनेक जण गोड बोलतात परंतू त्यातून असत्य कथन करता. त्यामुळे गोड बोला पण सत्य बोला, असा संदेश गुरुजी देतात.

रिपब्लिक महाराष्ट्र टीमच्या वतीने वाढदिवसा निमित्ताने हार्दिक अभिष्टचिंतन!!