Home Breaking News यूटीए तर्फे मोहम्मद फारूक सर यांचा बेस्ट जर्नालिस्ट अवॉर्ड 2021 देऊन केला...

यूटीए तर्फे मोहम्मद फारूक सर यांचा बेस्ट जर्नालिस्ट अवॉर्ड 2021 देऊन केला सत्कार

84

खामगाव : उर्दू टिचर्स असोसिएशन अमरावती व डिव्हिजन अमरावती च्या वतीने ऑल इंडिया मुशायरे चा आयोजन 13 फैब्रुअरी 2021 रोजी शेगाव येथील हाटेल विघ्नहर्ता येथे करण्यात आला होता या प्रसंगी अल्हाज अजीज खान अजीज साहब यांच्या मार्गदर्शनाखाली व अल्लामा ऐहसन नाजरी साहेब यांच्या अध्यक्षते खाली तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार घेण्यात आला होता या वेळी खामगाव येथील लोकमत समाचार चे विशेष प्रतिनिधी मोहम्मद फारुक सर यांना बेस्ट जर्नालिस्ट अवॉर्ड 2021 देऊन सत्कार करण्यात आले.
यु टी ऐ अमरावती डिव्हिजन अमरावती चे अध्यक्ष गाजी जाहेरोश , बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष फिरोज खान , अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष मोहम्मद नाजिम , यवतमाळ जिल्ह्यचे अध्यक्ष मोहम्मद सलीम , अमरावती जिल्ह्याचे उपाध्यक्ष असरार अहमद , खामगाव चे सदस्य मोहम्मद इद्रिस सर , नगरसेवक खामगाव इब्राहीम खान, जुलकर नैन पिंपळगाव राजा , वसीम पटेल शेगाव , इरफान दस्तगीर शेगाव , मोहम्मद नईम खामगाव , इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तीलावत ए कुरान ने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नंतर मान्यवरांचे पुष्पहार ,शाल देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक अंजुमन ज्युनिअर कॉलेज खामगाव तसेच लोकमत समाचार चे विशेष प्रतिनिधी मोहम्मद फारूक सर यांनी सुमारे गेल्या 31 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात लोकमत प्रिंट मीडिया मध्ये व दैनिक भास्कर समूहांमध्ये जिल्हा पातळी व राज्य पातळीवर विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले आहे या व्यतिरिक्त गेल्या तीन वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये सुद्धा काम करीत आहे अशाप्रकारे त्यांच्या या उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल 31 जानेवारी रोजी पुणे येथे शांतिदूत परिवारातर्फे शांतिदूत सेवा रत्न पुरस्कार 2021 व दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी शेगाव येथे उर्दू टीचर टीचर्स असोसिएशन अमरावती डिव्हिजन अमरावती तर्फे बेस्ट जर्नालिस्ट अवार्ड म्हणून मोमेंटो , शाल देऊन सत्कार करण्यात आले आपल्या प्रास्ताविक भाषणेत गाजी जाहेरोश यांनी उर्दू टीचर्स असोसिएशन अमरावती डिव्हिजन अमरावती या संस्थेबद्दल गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेले सामाजिक हिताच्या कामाची परिपूर्ण माहिती दिली तर अतिसुंदर सूत्रसंचालन मोहम्मद फारूक रजा सर शेगाव यांनी केले.