Home Breaking News बुलडाणा जिल्ह्यातील मुलीचा गुजरातमध्ये ‘बालविवाह’ करण्याचा प्रयत्न फसला

बुलडाणा जिल्ह्यातील मुलीचा गुजरातमध्ये ‘बालविवाह’ करण्याचा प्रयत्न फसला

77

बुलडाणा:महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था कार्यक्रम व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष बुलडाणा यांनी गुजरात चाइल्ड लाईन आणि बाल संरक्षण कक्ष व बाल विवाह प्रतिबंध अधिकारी जोलवा यांच्या मदतीने अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष, पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांच्या तक्रारीवरून गुजरात राज्यातील जोलवा, दहेज पोलिस स्टेशन अंतर्गत प्रत्यक्ष उपस्थित राहून ही बाल विवाह प्रतिबंध कार्यवाही करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अल्पवयीन बालिका हीचे लग्न लावण्यासाठी नियोजन करून गुजरात गाठण्यात आले होते.

पुरुषोत्तम बोर्डे यांनी मुलीच्या वडीलांच्या व आजी आजोबा यांच्या सांगण्यावरून चाईल्ड लाईन क्रमांक 1098 वर दिलेल्या तक्रारीवरून तसेच मंत्री महिला व बाल विकास यांच्या तत्काळ कार्यवाही मुळे दोन्ही राज्यातील बाल संरक्षण यंत्रणा सक्रिय होऊन आज पार पाडणारा बाल विवाह थांबविण्यात यश आले आहे. या प्रतिबंधात्मक कार्यवाहीत बुलडाणा येथील दैनिक लोकमंथनचे निवासी संपादक पुरुषोत्तम बोर्डे बुलडाणा यांनी मोलाची भूमिका बजावली.

तर सबंधितांवर बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालिकेच्या पुनर्वसनासाठी व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी कळविले आहे.