Home Breaking News ‘ब्रेक द चेन’च्या नावावर जनतेची व व्यापाऱ्यांची शासनाने केली फसवणूक- शेखर नागपाल

‘ब्रेक द चेन’च्या नावावर जनतेची व व्यापाऱ्यांची शासनाने केली फसवणूक- शेखर नागपाल

71

 

पाच एप्रिल पासून कडक निर्बंध लावून फक्त शनिवार व रविवारी* संपुर्ण लॉक डाऊन करण्यात येईल असे मंत्री मंडलातील जेष्ठ, श्रेष्ठ मंत्रीगण काल पासून सांगत होते मात्र आज आता प्राप्त जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून त्यांनी जनतेची व व्यापारी वर्गाची स्पेशल फसवणूक केल्याचे स्पस्ट झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊन ची घोषणा करून व्यापाऱ्यांसमोर भले मोठे संकट निर्माण केले आहे. लॉक डाऊन करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे नियोजन केल्या गेलं नाही, विजेचे बिल, नगर पालिका टॅक्स, इनकम टॅक्स, दुकानांचे भाडे, कर्जाचे हप्ते,ज्यांचे हातावर पोट आहे अश्यांचा उदरनिर्वाह कसा होईल याबाबत तरदूत करणे आवश्यक असतांना फक्त दुकाने बंद चा आदेश देने हा अन्याय कारक आहे . तब्बल पंचवीस दिवसांचा लॉक डाऊन करून व्यापाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणून ठेवली आहे. वर्ष भरात शासनाने कोरोना संदर्भात कोणत्या उपाययोजना केल्यात ह्या बाजूला ठेऊन जनतेला वेठीस धरण्याच्या या धोरणाचा निषेध करावा तेवढा कमीच!
वर्षभरात तालुका स्तरावर कोरोना टेस्टिंग ची एक लॅब उभारली गेली नाही, जिल्हास्तरावर लॅब सुरू केली तिचीही मर्यादा दिवसाला फक्त 1000 swab तपासण्याची आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट ही बेभरवश्याची असल्याचे सिद्ध झाले आहे. तालुका स्तरावरील कोविड सेंटर हे कंत्राटी डॉक्टर वर अवलंबून आहे एक ही *एम. बी.बी. एस डॉक्टर या ठिकाणी नाही.* एक ही व्हेंटलेटर या ठिकाणी नाही. फक्त टेस्टिंग चा सपाटा लावला आहे . Positive आल्यानंतर तुम्हाला पुढे रेफर केलं जाते, पुढे बेड मिळत नाही अश्यावेळी काय करावं हा मोठा प्रश्न आहे. स्वतःचे अपयश लपविण्यासाठी जनसामान्यांना वेठीस धरण्याचाच हा प्रकार का समजू नये ! ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्या साठी लॉक डाऊन हा आत्महत्या करण्याकरिता उपलब्ध करून दिलेला पर्याय ठरू नये  एवढीच माफक अपेक्षा !
आणि हो कितीही दिवस लॉक डाऊन करा कोरोना हद्दपार होणार नाही हे सूर्य प्रकाशा इतके सत्य आहे. लसीकरणाची गती अगदी धीम्या गतीनं, कोरोना चीन मध्ये गेला अन परत आला असे मुळीच नाही मग आपण झोपला होतात का ? आरोग्य खात्यात लक्षवेधक उपाययोजना केल्या नाहीतच मग आम्ही तुम्हाला फुकट काय मागतो !

नियमांचे पालन करून आम्हाला आमचे व्यवसाय करू द्या जगू द्या,*कोरोनाने मरू तेव्हा मरू वीणा कोरोनाने मारण्याची वेळ आमचेवर आणू नका एवढीच मागणी आहे आमची !
पुन्हा सांगतो लॉक डाऊन ने कोरोना ला हरविता येणार नाही नाही नाहीच !

आगामी दिवसात व्यापारी रस्त्यावर उतरल्यास त्याचे कोणाला आश्चर्य वाटायला नको तूर्त एवढंच !!

-शेखर नागपाल
अध्यक्ष व्यापारी संघटना
शेगाव