Home Breaking News गहू व मका खरेदी करण्यासाठी 14 खरेदी केंद्रांना मान्यता

गहू व मका खरेदी करण्यासाठी 14 खरेदी केंद्रांना मान्यता

187

बुलडाणा : रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व मका आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कमी किमतीत धान्य विकावे लागू नये व शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 14 खरेदी केंद्र सुरू झाली असून येथे 30 एप्रिल 2021 पर्यंत विक्री करण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. या खरेदी केंद्रांवर कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच कोरोना विषयक सुरक्षा नियम पाळावेत. हंगाम 2020-21 मध्ये आधार भूत किंमत योजनेतंर्गत केंद्र शासनाचे वतीने मका प्रति क्विंटल 1850 रूपये, ज्वारी प्रति क्विंटल 2620 रूपये, गूह 1975 प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे.

   नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी आधार कार्ड, 7/12 ऑनलाईन पिकपेरासह, बँक पासबुकची आधार लिंक केलेली झेरॉक्स व मोबाईल क्रमांक आदींसह संबंधीत खरेदी केंद्रांवर जावून ऑनलाईन नोंदणी करावी.   कोविड रूग्णांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नोंदणी करते वेळी केंद्रावर गर्दी करणे टाळावे, सॅनीटायर्झचा उपयोग करावा, तोंडावर मास्क वापरावे, सुरक्षित अंतर ठेवावे आदी बाबींचे पालन करावे. शेतकरी केंद्रावर नोंदणीसाठी अर्ज घेवून आल्यास सब एजंट संस्थांनी त्यांच्याकडून तात्काळ अर्ज घेवून शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करावी, ओ जिल्हा पणन अधिकारी यांनी कळविले आहे.

ही आहेत खरेदी केंद्र

 तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, बुलडाणा, दे.राजा, मेहकर, लोणार, मलकापूर,  शेगांव, खामगांव, जळगाव जामोद व संग्रामपूर, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या चिखली, माँ जिजाऊ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी दे. राजा केंद्र सिं. राजा, नांदुरा ॲग्रो  फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. नांदुरा केंद्र वाडी.