Home Breaking News मुंबईनंतर बुलडाणा पोलिस विभागात लेटर बॉम्बने खळबळ!

मुंबईनंतर बुलडाणा पोलिस विभागात लेटर बॉम्बने खळबळ!

493

 

खामगाव : शहरासह बुलडाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले आहेत अर्थात खुलेआम सुरु नाहीत, त्यामागे एक कारण आहे. मुंबईत 100 कोटींच्या लेटर बाँबची कथा अजून संपली नसतात बुलडाणा जिल्ह्यातील एका लेटरने सध्या खळबळ उडाली आहे.

 

बुलडाणा जिल्ह्यातील अवैध धंदे सध्या ‘ब्रेक द चेन, मोडवर आहेत. त्याला लॉकडाऊन किंवा कोरोनाचा संसर्ग हे कारण आहे असे वाटत असेल तर आपण चुकला आहात. कारण या काळात कोणत्याही प्रकारची काळजी न घेता बिनदिक्कत सर्व धंदे सुरू होते. आता मात्र धंदे बंद आहेत. अवैध धंदे करणारे, त्यांचे धंद्याचे ठिकाण, पार्टनर्शीप मध्ये कोण-कोण आहे, कोणत्या अवैध धंद्यासाठी वेग-वेगळे
साहेबांना किती हप्ता द्यावा लागतो व साहेबांचे भरवश्याचे वसुलीदार कर्मचारी कोण आहे, याची सविस्तर माहिती असलेले पत्र, व्हिडीओ शूटिंग वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या तरी अवैध व्यवसाय बंद दिसून येत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातअवैध मद्यविक्री, मटका, जुगार अड्डे, गुटखा विक्री , क्रिकेट
सट्टा यांसह सर्वच प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पत्रात नमूद आहे.. पोलिस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आशीर्वादाने हे सर्व सुरू असल्याचे सांगत कुणाला किती हप्ता जातो हे सुद्धा पत्रात नमूद आहे. हे पत्र गृहमंत्री तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे गेल्यावर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे फर्मान जारी झाले असल्याचे कळते.

पत्र खामगाव येथूनच?

अवैध धंद्याबाबत पाठविण्यात आलेले पत्र हे खामगाव येथून गेले अशी चर्चा आहे. या पत्रात अवैध व्यवसाय करणारे लोक, त्यांची नावे, फोटो, व्हिडिओ ही माहिती देण्यात आली असल्याचे कळते. तर एका पक्षाच्या नगरसेवकाचा या पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे.

मुंबई नंतर जिल्ह्यात लेटर बॉम्ब
पोलीस विभाग 100 कोटीच्या वसुली प्रकरणात चर्चत आलेला असून याबाबत परमवीर सिंह या मोठया अधिकारी यांनीच पत्र लिहून खळबळ उडवून दिली आहे. हे प्रकरण गाजत असताना आता बुलडाणा जिल्ह्यातील पोलिस विभागात अवैध धंदे व वसूलीबाबत नावे, आकडेवारीचा उल्लेख असलेल्या लेटर बॉम्बने खळबळ उडवून दिली आहे.