Home Breaking News कोविड लस घ्यायची किंवा घेतली असेल तर ही काळजी घ्या : वैद्यकीय...

कोविड लस घ्यायची किंवा घेतली असेल तर ही काळजी घ्या : वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला

72

खामगाव : सध्या कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर लसीकरण कर करणे आवश्यक आहे. लसीकरणानंतर कोविडचा धोका कमी होतो. मात्र आजही बरेच लोक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. लस आणि योग्य खबरदारी घेतली तर कोरोना आजारापासून आपण दूर राहू शकता. फक्त लसीकरण करण्यासाठी व केल्या नंतर काय काळजी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत.

कोविड लस घेतली तर अनेकांना एक ते दोन दिवस ताप येतो. तसेच अशक्तपणा देखील येतो. मद्यपानानंतर माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याचप्रमाणे ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांची समस्या आहे, अशांना मद्यपानंतर लगेच काही लक्षणे जाणवतात. अशा नागरिकांनी लसीकरणानंतर मद्यपान करणं चुकीचं ठरू शकतं, दरम्यान, लसीकरणानंतर माणसाचा आहार संतुलित असणं गरजेचं आहे. मद्यपानाच्या वेळी थंड आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन होतं. हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

या व्यतिरिक्त, लस घेताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे, त्यातले मुद्दे बघूया.…

18 वर्षांवरील लोकांचंच लसीकरण करण्यात येईल. सध्या 45 वर्षेच्या वर सुरू आहे.

दोन लशींना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण, एका व्यक्तीला दोन डोस देताना एकाच प्रकारची लस दिली जावी.

पहिला डोस घेतल्यावर एखाद्या व्यक्तीला लशीची रिअॅक्शन आली, म्हणजे लसीचे काही विपरित परिणाम दिसून आले तर, अशा व्यक्तीला दुसरा डोस दिला जाऊ नये.

ज्यांना सध्या कोव्हिड-19 झालेला आहे आणि ते उपचार घेत आहेत, अशांना लस देण्यात येऊ नये. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यावर चौदा दिवसांनंतर अशा व्यक्तींचा विचार होऊ शकतो.

ताप असताना लस घेऊ नये, लस घेण्याआधी कोरोना टेस्ट केली तर उत्तम. आजार लपवू नये. डॉक्टराना माहिती द्यावी.

कोरोना लसीकरणावर बरीच माहिती समोर येते आहे. त्यातली कुठली खरी, कुठली खोटी हा प्रश्नही हे जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्र व रुग्णालयात संपर्क करा.

एक लक्षात घ्या, लसीकरण केलं व नियम पाळले तरच तुम्ही कोरोनावर मात करू शकता