Home Breaking News बुलडाणा कोरोना : जितके मृत्यू वर्षभरात तितकेच तीन महिन्यात

बुलडाणा कोरोना : जितके मृत्यू वर्षभरात तितकेच तीन महिन्यात

71

 

बुलडाणा: जिल्ह्यातील कोरोनाने बाधीत रुग्ण वाढ थांबत नसून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 845 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाने महामारीनेचा उद्रेक पाहता जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन असून तपासण्या वाढवून रुग्ण ट्रेस केले जात आहेत. लसीकरण सुद्धा सुरू आहे. शहर आणि ग्रामीण भागात वाढते रुग्ण पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावले गेले आहेत. त्याचा परिणाम सामजिक जीवनावर होत असून लोक त्याला आता विरोध सुद्धा करत आहेत.

नियमांचे पालन करा- जिल्हाधिकारी

जिल्ह्यात शासनाने लागू केलेल्या कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन होत आहे किंवा नाही. जिवनाश्वयक वस्तु वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असतानाही दुकाने बंद आहेत की सुरू याबाबत पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती स्वत: आज बुलडाणा शहरात रस्त्यावर उतरले. निर्बंधांचे आदेश मोडणाऱ्या काही दुकानांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली व त्यांना नियमानुसार दंड ठोठाविला. कारवाई करताना जिल्हाधिकारी यांनी कोरोना संसर्गापासून स्वत:चे व कुटूंबियांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टसिंग नियम पाळावा व हात वारंवार धुवावे किंवा सॅनीटाईज करावे. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

मागील वर्षी कोरोना महामारी आली. 1 जानेवारी 2021 अखेरीस जिल्ह्यात कोरोनाने 152 रुग्ण दगावले होते. त्यानंतर 1 फेब्रुवारीच्या 2021 रोजी 169 मृत्यूवर आकडा पोहचला तसेच आजपर्यंत हा आकडा 302 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहली तर जेवढे रुग्ण 1 वर्षात दगावले तितके 150 मृत्यू गेल्या तीन ते सव्वा तीन महिन्यात झाले.त्यामुळे या आजाराची गंभीरता लक्षात घेता काळजी घेणे गरजेचे आहे.

असे आहेत तालुकानिहाय रुग्ण
▪️बुलडाणा:265▪️खामगाव:82
▪️शेगाव : 31 ▪️दे. राजा : 59
▪️चिखली : 64▪️मेहकर : 88
▪️मलकापूर: 73▪️नांदुरा : 37
▪️लोणार : 58▪️मोताळा : 29
▪️सि. राजा : 26 ▪️जळगाव : 31
▪️संग्रामपूर : 2