Home विदर्भ लाखो दिलो कि धडकन ” बनलीय अवघी सहा वर्षीय ‘कादंबरी’ ढमाळ 

लाखो दिलो कि धडकन ” बनलीय अवघी सहा वर्षीय ‘कादंबरी’ ढमाळ 

84

 

कादंबरीची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

या चिमुकलीच्या महापुरूषांचा इतिहास उलगडणाऱ्या चित्रफिती सह डान्स हि गाजतायेत

चिमूकलीचे भन्नाट व्हिडिओ होत आहेत व्हायरल;

शेगावची शिवकन्या कादंबरी झाली सोशल मीडिया ‘स्टार’

साभार : फहीम देशमुख

शेगाव: सध्या कोरोनाचा काळ जरी असला तरीही शेगावच्या कादंबरी ढमाळ या सहा वर्षीय चिमुकलीची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगलीय .. या चिमुकलीच्या महापुरूषांचा इतिहास उलगडणारे व्हिडीओ चांगलेच गाजतायेत .. सोबतच कादंबरी चे जोक्स , डान्स , लावण्या चे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेय .. त्यामुळे कादंबरी चे जवळपास १.९ मिलियन फॉलोवर्स सुद्धा आहेत ..
लहान मुलांचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. प्रत्येकाला मुलांचा खोडकरपणा, त्यांचे लाडात बोलणे कदाचित या करनामुळे मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील एका छोट्या मुलीचे भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगाव येथील हि सहा वर्षीय चिमुकली असून सध्या कादंबरी के.जी. २ ला शिकतेय .. मात्र इंस्टाग्राम वर श्रद्धा शिंदे यांचे व्हिडीओ बघत असताना कादंबरी ला ते आवडले .. आणि तिने तिच्या वडिलांकडे श्रद्द्दा शिंदे सारखे व्हिडीओ बनवण्याचा हट्ट केलाय .. तेव्हापासून कादंबरी ने व्हिडीओ बनवायला सुरुवात केलीय .. आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वर्णन करणाऱ्या अभिनय संपन्न व्हिडीओ मुळे परिसरात ती घरा-घरात पोहचली .. विशेष म्हणजे शिवमुद्रा तोंडपाठ असल्याने तीचे कौतूक होत आहे…

नुकतेच अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कांदबरीने तयार केलेला व्हिडीओ चांगलाच गाजलाय .. . सध्याच्या काळात लहान मुलांना टीव्ही, मोबाईलचे व्यसन जडले असताना, या चिमुकलीला महापुरूषांच्या विचारांवर आधारित अभिनय करावासा वाटणे, हे नक्कीच गौरवास्पद म्हणावे लागेल… कादंबरी ला महापुरुषांच्या शौर्याचे वर्णन सोबतच लावण्या , डान्स , जोक्स हि तोंडपाठ आहेत .. तर कादंबरीने मुलींना व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आवाहन हि खूप गाजतंय ..
शेगाव चा धमाळ तसा परिवारही पुरोगामी विचारांचा असल्याने त्यांनी लहानपणापासूनच कांदबरीवर चांगले संस्कार केले आहेत…घरून प्रोत्साहन मिळत असल्याने आपल्या अभिनय कौशल्यातुन कादंबरी अभिनय क्षेत्रात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तिच्या घरच्यांना वाटतोय.. कारण शिक्षणाबरोबरच इतिहासाचे धडेही तीला देण्यात येत आहेत…कादंबरीच्या या कामगिरीवर देशभरातून विशेष म्हणजे नामवंत मराठी कलावंत, गायक, क्रिकेटपटू, समीक्षक आदींनी तिचे व्यक्तिशः कौतुक देखील केले आहे.

सोशल मीडिया स्टार…

इन्स्टाग्राम : १.९ मिलियन्स
टिकटॉक बॅन चॅनल : २ मिलियन
——————–