Home विदर्भ चिंचोली येथील गायणाचार्य गणेश महाराज बोबडे टीव्हीवर

चिंचोली येथील गायणाचार्य गणेश महाराज बोबडे टीव्हीवर

90

शेगाव : शेगाव तालुक्यातील वारकरी परंपरा लाभलेले आदर्श गाव म्हणून चिंचोलीची ओळख आहे. आजही या गावात धार्मिक कार्यक्रमांची सातत्याने रेलचेल सुरू असते. हरिनाम सप्ताह, कीर्तनाचे कार्यक्रम, दररोज हरिपाठ काकड, आरती प्रवचने सुरू असतात या गावात होतात. येथील तरुणआजही वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासत आहेत. अशाच एका तरुणाची आज आपण ओळख करून घेणार आहोत. गणेश बोबडे असे या तरुणाचे नाव असून सध्या हभप गणेश महाराज बोबडे या नावाने ते गायनाचार्य म्हणून प्रकाशझोतात आले आहेत.


गायनाचार्य म्हणून अल्पावधीतच त्यांनी मोठी ख्याती प्राप्त केली आहे. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर येथील विविध कार्यक्रमात सुद्धा गणेश महाराज गायनाचार्य म्हणून सहभागी होतात तसेच परिसरात योजित होणार्‍या कीर्तनाच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असतो.

‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ हा कार्यक्रम फक्त मराठी या वृत्तवाहिनीने सुरू केला आहे त्यामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या कीर्तनाच्या कार्यक्रमात गणेश महाराज बोबडे यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या रूपाने चिंचोली गावाचा नावलौकिक आणखीनच वाढला आहे. चिंचोली येथून श्री संत सखाराम महाराज संस्थान इलोरा सखारामपुर व भोजने महाराज संस्थान येथे पायीवारी जात असते. तसेच गजानन महाराज मुक्ताई माऊली यासह अनेक पालकांच्या आगमन गावात होते. यातही गणेश महाराज गायनाचार्य म्हणून सहभागी होतात. इलोरा येथे चिंचोली गावाचा मानाचा फळ असून सव्वाशे वर्षा पेक्षा जास्त वारीची परंपरा या गावाला आहे .त्यामुळे मानाचे काल्याचे किर्तन चिंचोली येथील फळावर होते. गावातील मंदिराचा आजही सूक्ष्म कानोसा घेतला तर जणू तुकोबाचे अभंग कानावर पडल्याचा भास होतो. अध्यात्म माणसाच्या आयुष्यात चांगुलपणा आणते.पुण्य ते परोकार पाप ते परपीडा असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे, तेच अध्यात्माचे आचरण प्रत्येकाने आपल्या आपल्या जीवनात करावे असा संदेश या गावातील कीर्तन प्रवचनातून दिला जातो आजच्या डिजिटल युगातही चिंचोली गावातील तरुण शिक्षणासोबतच वारकरी संप्रदायाची परंपरा सुद्धा जोपासत आहेत..गणेश महाराज बोबडे यांना विद्यार्थिदशेपासूनच गायनाची आवड होती.  तर आता गायनाचार्य म्हणून हभप गणेश महाराज बोबडे प्रसिद्धीस येत आहेत.