Home Breaking News जिल्ह्यात सध्या रूग्णालयात फक्त 110 रुग्ण

जिल्ह्यात सध्या रूग्णालयात फक्त 110 रुग्ण

86

कोरोना अलर्ट : प्राप्त 2954 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 43 पॉझिटिव्ह

41 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2997 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2954 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 43 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 29 व रॅपीड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 722 तर रॅपिड टेस्टमधील 2232 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2954 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 4, बुलडाणा तालुका : दत्तापूर 1, चिखली तालुका : शेलसूर 1, इसरूळ 1, गांगलगांव 2, नायगांव 1, बेराळा 2, नांदुरा तालुका : इसापूर 2, मलकापूर शहर : 2, मलकापूर तालुका : उमाळी 1, दसरखेड 1, मोताळा तालुका : शेलापूर 1, शेगांव शहर : 1, शेगांव तालुका : मनारखेड 1, जानोरी 1, भोनगांव 1, संग्रामपूर तालुका : अकोली खु 3, कवठळ 1, खामगांव तालुका : तांदुळवाडी 1, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : सरंबा 1, जांभोरा 1, पांगरी 1, माळेगांव 1, भिवगण 1, सिं. राजा तालुका : वाकड 1, किनगांव राजा 2, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, मेहकर तालुका : मोहतखेड 1, लोणार शहर : 1, परजिल्हा सावंगी ता. भोकरदन 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 43 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे वर्दडी ता. सिं.राजा येथील 38 वर्षीय पुरूष व पिंप्री खंडारे ता. लोणार येथील 32 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 41 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 561086 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85716 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 85716 आहे.
आज रोजी 1090 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 561086 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86484 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85716 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 110 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 658 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.