Home Breaking News चितोडा अंबिकापुर येथील दंगल पिडीत वाघ कुटुंबीयांची आमदार राजेश एकडे यांनी घेतली...

चितोडा अंबिकापुर येथील दंगल पिडीत वाघ कुटुंबीयांची आमदार राजेश एकडे यांनी घेतली भेट

79

खामगाव:  तालुक्यातील चितोडा अंबिकापुर येथे किराणा दुकानाच्या उधारीच्या पैशाच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता त्यानंतर संतप्त जमाव एकत्र येत वाघ कुटुंबियाच्या घरावर हल्ला चढवत वाघ कुटुंबीयांचे घर पेटून देण्याचा प्रयत्न करण्यात आला व त्यांच्या घरातील किमती साहित्याची लूट करून ट्रॅक्टर व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले होते याची माहिती मिळताच मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की खामगाव तालुक्यातील चितोडा अंबीकापुर येथे किराणा दुकानाच्या उधारीच्या पैशाच्या कारणावरून वाघ व हिवराळे कुटुंबीया मध्ये वाद झाला होता त्यानंतर दोन गट आमने-सामने येऊन त्यांच्यामध्ये हाणामारी झाली होती त्यानंतर वाघ कुटुंबातील काही महिला सदस्य व लहान मुलांना काही समाजकंटकांनी मारहाण करत वाघ कुटुंबियाच्या घरावर संतप्त जमाव चालून गेला व वाघ कुटुंबीयांचे घर आग लावून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये मोठ्या प्रमाणावर आगीमध्ये घरातील किंमती सामान जळून खाक झाले तसेच उर्वरित सदस्याच्या घरातील सामानाची नासधूस करून संतप्त जमावाने लुट केली

तसेच वाघ कुटुंबीयांचे ट्रॅक्टर व छोटा हत्ती माल वाहक वाहनांचे पन मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून खुप मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते याची माहिती मिळताच मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश ऐकडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली असता गावातील नागरिकांनी आमदार एकडे यांच्या समोर काही समाजकंटकांची पोथी वाचली व समाजकंटकांचा त्रास दूर व्हावा यासाठी आपन प्रयत्न करावा या वेळी वाघ कुटुंबीयांवर हल्ला करून वा कुटुंबीयांचे घर पेटवून देणाऱ्या तसेच घरातील साहित्याची लूट करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक व्हावी व त्यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी याकरिता आमदार राजेश एकडे यांनी वरिष्ठांशी लवकरच चर्चा करणार असल्याचे सांगितले

तसेच गावातील नागरिकांची भेट घेऊन शांतता ठेवण्याची विनंतीही केली यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते विठ्ठल लोखंडकार, शिवसेनेचे अनील अमलकार, मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ लगर,रवीभाऊ महाले प्रतीक लोखंडकार आनंद गायगोळ, आकाश पाटील, विनोद अनिल अमलकार टिकार,अनंता शळके सुभाष फेरण श्याम पाटेखेडे मुकेश गावंडे सुरज बेलोकार शिवा लगर पवन राजे डिक्कर, यांच्यासमवेत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते