Home Breaking News राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात ना.शिंगणेंचे धक्कादायक विधान !

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात ना.शिंगणेंचे धक्कादायक विधान !

82

तर ५० लाख होतीलसंक्रमीत ? सर्वाधीक लहान मुले!

बुलडाणा:महाराष्ट्रात जर दुर्दैवाने कोरोनाची तिसरी लाट आलीतर जवळपास ५० लाख रुग्ण संक्रमीत होण्याची शक्यता असून, त्यात मागील काही दिवसांपासून चाललेल्या चर्चेप्रमाणे सर्वाधीक लहान बालकांचा समावेश असण्याची धक्कादायक शक्यता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त करुन.. त्यात जर ८ लाख अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असले तर त्यातील जवळपास ५ लाख रुग्ण हे लहान बालके असणार असल्याचा अंदाज आहे. यापैकी अडीच टक्के रुग्ण हे शासकीय वैद्यकीय सेवेत उपचार घेवू शकतात, तर साडेतीन टक्के रुग्ण हे अन्य बालरोगतज्ञ तथा इतरत्र हॉस्पीटलमध्ये उपचार घेवू शकणार असल्याचा अंदाज शासनाने बांधला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र दुसऱ्या लाटेपासून राज्य सरकार बरेच काही शिकले असून, तिसरी लाट दुर्दैवाने जर आलीतर त्यावर मात करण्यासाठी शासन तयार असल्याचेही ना.शिंगणे म्हणाले.

बुलडाणा जिल्हा नियोजन भवनात झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना ना.डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले की, दोनच दिवसापुर्वीच राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली.

त्यात झालेल्या चर्चेनुसार जर कोरोनाची तिसरी लाट राज्यात आलीतर तिच्यावर कशा पध्दतीने नियंत्रण प्राप्त करायचे, यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. मा.मुख्यमंत्र्यांनी सुध्दा या संबंधीत सर्व अधिकारी व या क्षेत्रातील मान्यवर व टास्कफोर्सचे सर्व सदस्य यांच्याशी सविस्तर संवाद साधून त्याची माहिती घेत जर दुर्दैवाने तिसरी लाट आलीतर काय होवू शकते? याचा आढावा घेतला. अंदाजानुसार तिसऱ्या लाटेमध्ये ५० लाख रुग्ण संक्रमीत होण्याची शक्यता आहे. त्यातील अ‍ॅक्टीव्ह पेशंटचा आकडा हा ८ लाखापर्यंत जावू शकतो. गेल्या काही दिवसांपासून लहान बालकांना तिसऱ्या लाटेचा जो धोका सांगितल्या जात आहे त्या अंदाजाप्रमाणे त्यातील जवळपास ५ लाख रुग्ण लहान मुले राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सीजन, रेमडेसीवीर व अन्य औषधांचा जो तुटवडा जाणवला, तसा प्रकार जर दुर्दैवाने तिसरी लाट आलीतर होवू नये, यासाठी राज्य शासन सतर्क असल्याने तिसरी लाट ही लवकर थोपवता येवू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.