Home Breaking News युवराज छत्रपती संभाजीराजेंनी का व्‍यक्‍त केली दिलगिरी ?

युवराज छत्रपती संभाजीराजेंनी का व्‍यक्‍त केली दिलगिरी ?

77

खामगाव ः युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले हे जनसंवाद दौऱ्यानिमित्‍त आज खामगाव येथे आले. तसेच चिखली बायबास स्‍थित हॉटेल विजयलक्ष्मी येथे त्‍यांनी भोजन केले. परंतु, सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी करणे सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हितवाह नसल्याने, मी या भव्य रॅलीला व संवाद स्थळी उपस्थित राहण्याचे टाळले त्‍याबद्दल खामगावकरांची मी दिलगिरी व्‍यक्‍त करतो असा संदेश त्‍यांनी आपल्‍या फेसबूक पेजवरुन खामगावकरांना दिला आहे.


युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा (ता.४) खामगाव येण्याचा कार्यक्रम नियोजित होता. मराठा आरक्षणाच्‍या प्रश्नावर सुरु केलेले मूक आंदोलन महिनाभरासाठी स्‍थगित केल्‍यानंतर युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी संवाद दौरा सुरु केला आहे. शुक्रवार (ता.२) रोजी पुणे येथून सुरु झालेल्‍या त्‍यांच्‍या संवाद दौऱ्यात आज ४ जुलै रोजी त्‍यांचे खामगाव येथे अागमन झाले. तसेच चिखली बायबास स्‍थित हॉटेल विजयलक्ष्मी येथे त्‍यांनी भोजन केले. त्‍यानंतर, शहरातील सर्व नियोजित कार्यक्रमांना संभाजी राजे उपस्‍थिती लावतील अशी अपेक्षा असलेल्‍या शहरवासियांनी त्‍यांच्‍या स्‍वागताची जय्यत तयारी केली होती. परंतु, ते अचानकपणे पुढील प्रवास लांबचा असून आम्‍हाला निघणे गरजे असल्‍याचे सांगित अकोलाकडे रवाना झाले. त्‍यामुळे शहरातील कार्यक्रमांची जय्यत आखणी करणाऱ्या समाजबांधवांचा हिरमोड झाला. दरम्‍यान काही वेळाने “”युवराज संभाजी राजे भोसले यांनी आपल्‍या अधिकृत फेसबुक पेज वरुन खामगाव व छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध फार पुर्वीपासून आहेत. राजर्षी शाहू छत्रपतींचा पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. आज जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने विदर्भ दौऱ्यावर असताना खामगाव गावात गेलो होतो. याठिकाणी स्वागतासाठी हजारो तरुण, तरुणी, व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांच प्रेम पाहून निश्चितच बळ मिळत, परंतू सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी करणे सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हितवाह नसल्याने, मी या भव्य रॅलीला व संवाद स्थळी अनुपस्थित राहिलो. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांचा वंशज व त्यांच्याच विचारांवर चालणारा कार्यकर्ता असल्याने सर्वांच्या सुरक्षतेची खबरदारी घेणे मला योग्य वाटले. या कृतीमुळे खामगाववासीयांची मने दुखावली असल्यास मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर मी निश्चितपणे खामगावला येवून सर्वांना भेटणार आहे. अशा आशयाचा मजकूर पोस्‍ट केला आहे.