Home Breaking News प्रत्येक बेघराला हक्काचे घर देणारच – आ. अँड. आकाश फुंडकर

प्रत्येक बेघराला हक्काचे घर देणारच – आ. अँड. आकाश फुंडकर

84

घरकुल  उद्घाटन, उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार

खामगाव : प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रत्येक बेघराला घर बांधून देणारच असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांनी केले. त्यांचे शुभहस्ते आज केंद्र शासन महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधी दरम्यान खामगाव पंचायत समिती यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई योजना, शबरी, व पारधी आवास योजना मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्राम पंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच, शिपाई,रोजगरसेवक, डेटा ऑपरेटर, अभियंता आदी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार पुष्गुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प स सभापती सौ रेखाताई मोरे , तर प्रमुख उपस्थितीत गटविकास अधिकारी चंदनसिह राजपूत, जि प सदस्य सौ मालूताई मानकर, ज्ञानदेवराव मानकर, प स सदस्य राजेश तेलंग, जि प बांधकाम अभियंता श्री गुढदे , आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आमदार अँड आकाशदादा फुंडकर म्हणाले की नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी देशातील प्रत्येक बेघरांना घर देण्याचा संकल्प केला, आपल्या स्वतःचे घर व्हावे हे स्वप्न प्रत्येकाचे असते ते ओळखून मोदींजींनी प्रधानमंत्री आवास योजना आणली व त्यामधातून जोमाने काम सुरू केले. 2022 पर्यंत प्रत्येक बेघराला घर देण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले असून त्याप्रमाणे जोमाने काम सुरू आहे. खामगाव तालुक्यात 28 हजार लोकांना आपल्या हक्काची घरे देणार असून त्यापैकी 22 हजार गरजू लाभार्थ्यांची मॅपिंग झाली आहे. त्यामुळे त्याला खरच घर पाहिजे त्यालाच मिळेल कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची काम आम्ही करत आहोत. आमचे जि प, पस सभापती , उपसभापती, सद्स्य असो की सरपंच हे मेहनतीने काम करीत आहेत. त्यांचे खांद्याला खांदा लावून प्रशासनातील अधिकारी सुद्धा खास काम करीत आहेत. या सर्वांच्या मेहनतीनेच खामगाव प स ने केंद्र, राज्य व विभाग स्तरावर मोठे पुरस्कार या वर्षात मिळवून खामगाव चे नाव लौकिक केले आहे. असेच लोकप्रतिनिधी सोबत राहून प्रशासकीय अधिकारयांनी काम करत राहावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व इतर व्यवसाय प स मार्फत शेतकऱ्यांनी करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले. सर्वप्रथम आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते प्रधानमंत्री आवास योजणे अंतर्गत होणाऱ्या घरकुल डेमोचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी सभागृहात या योजनेसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रा प कर्मचारी, रोजगार सेवक, ग्रामसेवक, सरपंच ,सदस्य ,अभियंता व इतर अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री ग्राम आवास योजने अंतर्गत जलका तेली, भंडारी, पिंप्रळा, उत्तम घरकुल लाभार्थी मध्ये श्रीकृष्ण ताठे मक्ता कोकता, सुरेश लोळे पळशी खु, बापूराव देशमुख पळशी खु, ग्रामपंचायत अनुक्रमे लोखंडा, शेलोडी व चिंचपूर , घरकुल लाभार्थी भारत बाभुलकरशेलोडी, भगवान हिवराळे लोखंडा, व राजेंद्र सरदार चिंचपूर ,लाखनवाडाचे अमोल मोरे, रहेमत खान, विश्वनाथ पांढरे, संजय वानखडे, शिरला नेमाने चे योगेश इंगळे, विजय राठोड, विजय राठोड, व ज्ञानेश्वर ताथोड, कंझरा विशाल फुंडके, पंकज देशमुख, कडूबा नीतोने, नैमुल्ला खान , पी राजा येथील विनोद चव्हाण, मंगेश दसरकर, व गजानन भातुरकर, चिंचपूर येथील तुकाराम राठोड, अनंत शेळके, गजानन सिरसाकार, पुरुषोत्तम अंभोरे, नानाजी माँठे, अर्चना इंगळे, विलास तायडे, मुरलीधर मिरगे,यांचा समावेश आहे.