Home Breaking News मोदी सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळवा 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज

मोदी सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळवा 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज

87

 

 

खामगाव – तुम्हाला तुमचा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला सरकारकडून मदत मिळू शकते. मोदी सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मुद्रा योजनेअंतर्गत लहान व्यवसायांसाठी भांडवल आणि मुदत कर्जासाठी निधी देत आहे. या योजनेचा लाभ घेऊन अनेक जण दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळवत आहेत.मुद्रा कर्जाच्या माध्यमातून एसबीआयने यशस्वी व्यावसायिकांच्या यशोगाथा शेअर केल्या आहेत. एसबीआयच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, विजयवाडाच्या गोपू सिरीशा यांनी एसबीआयच्या एसएमई सेंटर शाखेतून 5 लाख रुपयांचे मुदत कर्ज घेऊन पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग युनिटची स्थापना केली. सिरीशा एमबीए पदवीधर आहे पण कौटुंबिक समस्यांमुळे त्या गृहिणी झाल्या. पण मग कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.।

सिरिशा यांनी बँकेकडून 5 लाख रुपयांचे मुदत कर्ज आणि 1.50 लाख रुपयांची कॅश क्रेडिट लिमिट घेऊन पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केले. व्यवसाय यशस्वी झाला. पुढे त्यांचा नवराही खासगी नोकरी सोडून त्याच्या व्यवसायात आला. एसबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 2017-18 मध्ये सिरिशा यांची अंदाजे उलाढाल 33.12 लाख रुपये होती. सर्व प्रकारचे खर्च वजा केल्यावर दरमहा 20 हजार रुपये निव्वळ नफा त्यांना होतो.

कोलॅटरल सिक्युरिटीशिवाय लोन उपलब्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) लाँच केले. नॉन-कॉर्पोरेट, नॉन-फॉर्म लघू/सूक्ष्म उद्योगांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. मुद्रा कर्ज व्यावसायिक बँका, RRB, लघु वित्त बँका, सहकारी बँका, MFI आणि NBFC कडून घेतले जाऊ शकतात. यात ‘शिशू’, ‘किशोर’ आणि ‘तरुण’ अशी तीन प्रकारची प्रॉडक्ट्स आहेत.

शिशू श्रेणीसाठी 50,000 रुपये, किशोर वर्गासाठी 50,001 ते 5 लाख रुपये आणि तरुण वर्गासाठी 5,00,001 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. SBI च्या मते, खेळते भांडवल/मुदतीचे कर्ज 3 ते 5 वर्षात परत करावे लागते. यात 6 महिन्यांपर्यंतची स्थगिती देखील समाविष्ट आहे. MSE युनिट्ससाठी शिशु आणि किशोर कर्जासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी /अपफ्रंट फी नाही. त्याच वेळी, तरुण श्रेणीच्या कर्जासाठी, प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के (प्रभावी कर देखील) द्यावी लागते.