Home Breaking News राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा धडाका

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा धडाका

81

* 9 गुन्हे नोंदवून 7 आरोपींना अटक
* पहुरजिरा येथे ट्रकसह मुद्देमाल जप्त

बुलडाणा,(जिमाका) दि. 23: राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्र, साठवणूक व वाहतूकीविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. विभागाचे नागपूरचे विभागीय उप-आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात पुन्हा 22 नोव्हेंबर रोजी धडक मोहिम राबविण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री, साठवण व निर्मिती वर कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे.
धडक मोहिमेदरम्यान सिं. लपाली, बोराखेडी, सारोळा ता. मोताळा, पहुरजिरा ता. शेगांव, शेलगांव आटोळ ता. चिखली, या ठिकाणी अवैध दारु धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकुण 9 गुन्हे नोंदविण्यात आले, तर 7 वारसा नोंदवून गुन्हे 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये 71 लि. हातभट्टी दारु, 1550 लि. रसायन, 5.4 लि. देशी दारु, 7.5 लि. विदेशी दारु व एक वाहन जप्त करुन 11 .44 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. मोहिमेत शेगांवचे दुय्यम निरीक्षक एन. के मावळे, चिखलीचे निरीक्षक जी. आर गावंडे यांचे पथकाने दारूबंदी गुन्ह्याकामी खामगांव ते जलंब रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर पहुरजिरा ता. शेगाव येथे सापळा लावून एक चार चाकी टाटा कंपनीचा आयशर ट्रक क्रमांक एमएच 11 सीएच 4882 जप्त करण्यात आला आहे. तसेच अशोक भिकाजी कोंडे रा. पहुरजिरा याकडून महाराष्ट्र राज्यातून प्रतिबंधीत असलेल्या गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेश मद्य साठ्याचा गोल्डन ॲस ब्ल्यु व्हिस्की या ब्रॅण्डच्या 750 मि.ली क्षमतेच्या एकूण 10 विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत. बॉटल व एक चार चाकी वाहन जप्त करून आरोपीत इसमाविरूद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 1949 चे कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत खामगांवचे दुय्यम निरीक्षक आर. के फुसे, जवान अमोल सुसरे, गणेश मोरे, प्रफुल्ल साखरे, संजीव जाधव व सौ. शारदा घोगरे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एन. के. मावळे करीत आहे.
आपल्या परीसरात अशी अवैध मद्य विक्रीची अथवा बनावट मद्य निर्मीती आढळल्यास विभागाचे टोल फ्री नंबर 1800833333 वर किंवा व्हॉट्अॅप नंबर8422001133 वर किंवा excisesuvidha. mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर माहिती कळविण्यात यावी. तसेच ज्याप्रमाणे वाहन चालविताना वाहनांचा परवाना आवश्यक आहे. त्याप्रमाणे मद्य बाळगतांना, मद्य सेवन, मद्य वाहतुक करतांनासुद्धा सदर विभागाचा मद्यसेवन परवाना असणे बंधनकारक आहे. अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करताना अथवा मद्यविक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 1949 चे कलमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी दिला आहे.