Home Breaking News मराठा पाटील युवक समितीस राजमाता जिजाऊ जनसेवा पुरस्कार तर स्वप्नील ठाकरे पाटील,...

मराठा पाटील युवक समितीस राजमाता जिजाऊ जनसेवा पुरस्कार तर स्वप्नील ठाकरे पाटील, विनायक टिकार यांना स्वामी विवेकानंद युवा गौरव सन्मान

86

 

द रिपब्लिक दिनदर्शिका विमोचन व पुरस्कार सोहळा

खामगाव : दैनिक द रिपब्लिकच्या वतीने मराठा पाटील युवक समिती बुलडाणा यांना राजमाता जिजाऊ जनसेवा पुरस्कार तर स्वप्नील ठाकरे पाटील , विनायक टिकार यांना स्वामी विवेकानंद युवा गौरव सन्मान देवून गौरविण्यात आले.तसेच द रिपब्लिक दैनिकाच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. २१ जानेवारी रोजी येथील पत्रकार भवनात हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ह.भ.प. ज्ञानेश्वरजी मिरगे गुरुजी होते. तर कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण, काँग्रेस कमिटीचे राज्य सचिव धनंजय दादा देशमुख, मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे, खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक पंजाबरावदादा देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश टिकार, नगरसेवक सतीषअप्पा दुडे, श्री छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्नील ठाकरे पाटील, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.

दिनदर्शिकेचे विमोचन करताना मान्यवर

त्यानंतर द रिपब्लिकचे संपादक श्रीधर ढगे पाटील यांनी नव्यानेच सुरू झालेल्या पुरस्कारांची घोषणा व त्यांचा परिचय करून दिला. यावर्षी मराठा पाटील युवक समितीचे अध्यक्ष गजानन ढगे ,जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे , माजी जिल्हाध्यक्ष बाळू पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना संघटनेचा राजमाता मा जिजाऊ जनसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

.तसेच श्री छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील यांना स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हाच पुरस्कार माऊली अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष विनायक टिकार यांना सुद्धा होता मात्र ते काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमाला येऊ न शकल्याने कार्यक्रमानंतर मराठा युवक समितीच्या कार्यालयात त्यांना गजानन ढगे पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह घेऊन पुरस्कार देण्यात आला. पत्रकार भवनातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक तरुण भारतचे शेगाव प्रतिनिधी नंदू कुळकर्णी यांनी केले. त्यानंतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत रिपब्लिक या उपक्रमाचे तसेच पुरस्कार सोहळ्याचे कौतुक केले.

ह भ प ज्ञानेश्वर मिरगे गुरुजी यांनी सर्व पत्रकारांना उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात बाळासाहेब बिनीवाले पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार शरद देशमुख तसेच महिला पत्रकार मोनाली वानखेडे यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे बहारदार संचलन ग्राम क्रांतीचे कार्यकारी संपादक संभाजीराव टाले तर आभार प्रदर्शन अनिल उंबरकर व विठ्ठल निंबोळकर यांनी केले कार्यक्रमाला मराठा पाटील युवक समिती सर्व पदाधिकारी सदस्य श्री छत्रपती प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी माऊली अर्बन सोसायटी परिवारातील सदस्य शहरातील नागरिक व शहरातील नागरिक व पत्रकार बांधवांचे उपस्थित उपस्थिती होती नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजन करून पत्रकारांचा मनोमीलन सोहळा साजरा केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खामगाव प्रेस क्लब अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तसेच खामगाव शेगाव येथील पत्रकार बांधवांनी पुढाकार घेतला.