Home Breaking News अंबाबरवा अभयारण्यातील जंगल सफारी पूर्ववत सुरू करा!

अंबाबरवा अभयारण्यातील जंगल सफारी पूर्ववत सुरू करा!

85

 

गाईड व जिप्सी चालकांची जिल्हाधिकऱ्यांकडे मागणी

संग्रामपूर – अंबाबरवा अभयारण्यातील जंगल सफारी पूर्ववत सुरू करण्यात यावी शी मागणी या अभयारण्यातील गाईड व जिप्सी चालकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनामध्ये नमूद आहे की, कोरोनाविषाणू साथीच्या रोगांमुळे संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्य मधील जंगल सफारी बंद करण्यात आली आहे. यामुळे आम्हा जिप्सी चालकांवर व गाईड वर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा एकच स्त्रोत आहे. त्यामुळे आमला मानधन देण्यात यावे. जेणेकरून आमचे जीवन जगणे सोयीचे होईल. तसेच मागील दोन वर्षापासून पर्यटन बंद केले होते त्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागेल. याचा विचार करता अभयारण्यातील जंगल सफारी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर गाईड सुमित पालकर, किशोर सिंग बाबर, आकाश चतुर, सुनील खिराळे, खुमसीग डावर ,दिलीप जाधव, राम कासदेकर, गजानन बामणे, बंडू चव्हाण, लालचंद जांभळी, सागर पालकर, दिलीप मुझलदा, रामेश्वर मावस्‍कर, सरीचंद कोलटकर, रोमती पालकर,  जिप्सी चालक जिवंन तडवला,  खुमसिंग डाबर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.